महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सेवा सुधारण्या संदर्भात प्रभारी अधीक्षक डॉ.संदीप सावंत यांच्याशी चर्चा

सावंतवाडी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात सेवा सुधारण्या संदर्भात मनसेच्या शिष्टमंडळाने घेतले प्रभारी अधीक्षक डॉ.संदीप सावंत यांची भेट व रुग्णांची होणारे हाल व उपलब्ध नसलेल्या सोयीसुविधांबाबत केली सविस्तर चर्चा यावेळी करण्यात आली.
यादरम्यान मागील काही दिवसापासून मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडे उपचार घेतलेल्या रुग्णांनी केलेल्या तक्रारी यासंदर्भात विचारण्यात जाब तसेच फोन द्वारे डॉक्टर व रुग्ण यांचा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी संवाद साधून देत झालेल्या चुकीच्या उपचारांबाबत अधीक्षक श्री डॉ सावंत यांच्या निदर्शनास आणून दिले .
यावेळी म.न.वि.से जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार परिवहन जिल्हाध्यक्ष राजू कासकर, कार्याध्यक्ष संतोष भैरवकर माजी तालुका उपाध्यक्ष अतुल केसरकर ,शहर उपाध्यक्ष प्रवीण गवस ,निलेश देसाई ,आदी मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते. त्याचप्रमाणे रुग्णालयातील विविध समस्यांबाबत अधीक्षक श्री सावंत यांच्याशी चर्चा करण्यात आली. यानंतर अधीक्षक श्री सावंत यांनी उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांची बैठक लावून योग्य त्या सूचना दिल्या जातील असे आश्वासन मनसेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. तसेच डॉक्टरांची सेवा 15 दिवसात न सुधारल्यास मनसेच्या वतीने तक्रारदार रुग्णांसह उपजिल्हा रुग्णालयात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा उपस्थित मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी अधीक्षक श्री डॉ सावंत यांना दिला.
प्रतिनिधी / कोकण नाऊ / सावंतवाडी