अहिल्या प्रभाग संघ खारेपाटण यांच्या मार्फत ५ वीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन

उमेद, महाराष्ट राज्य राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत, “अहिल्या प्रभाग संघ खारेपाटण” या प्रभाग संघाची 2025 या आर्थिक वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यात Model CLF म्हणजेच आदर्श प्रभाग संघ म्हणून निवड झालेली आहे.
अहिल्या प्रभाग संघ खारेपाटण आयोजित ५ वी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सराव परीक्षा, जिल्हा परिषद केंद्र शाळा खारेपाटण येथे दिनांक 11/2/2026 रोजी ठीक सकाळी ठीक 10 वाजता सुरू होणार असून त्याच दिवशी उत्तीर्ण मुले व सहभागी मुलांना आकर्षक बक्षिस देण्यात येणार आहे. पेपर चेक करून त्याच दिवशी संध्याकाळी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार आहे, त्यामुळे तळेरे प्रभागातील शिक्षकांनी आपल्या 5 वीच्या विद्यार्थ्यांना घेऊन वेळीच उपस्थित रहावे. मुलांना बिस्कीट व पाण्याची बॉटल देण्यात येणार आहे. असे अध्यक्ष, कोषाध्यक्ष, सचिव, अहिल्या प्रभाग संघ खारेपाटण यांच्या मार्फत सांगण्यात आले आहे.

error: Content is protected !!