काजू आंबा नुकसानीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणेंची तात्काळ दखल

कॅबिनेट बैठकीत मांडला मुद्दा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तात्काळ अहवाल मागवला

मंत्रिमंडळाच्या बैठकीत सिंधुदुर्ग व कोकणातील आंबा-काजू हंगामातील नुकसानीचा मुद्दा पालकमंत्री नितेश राणे यांनी ठामपणे मांडला. यावर्षी आंबा मोठ्या प्रमाणात गळून पडल्याने बागायतदारांवर आर्थिक संकट ओढवले असल्याची माहिती मुख्यमंत्री व मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी विभागाकडून तातडीने परिस्थितीचा सविस्तर अहवाल मागवण्याचे निर्देश दिले असून, लवकरच त्यांच्या नेतृत्वाखाली आंबा बागायतदारांची बैठक घेऊन मदतीबाबत निर्णय घेतला जाणार आहे. राज्य सरकार आंबा बागायतदारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील,अशी ग्वाही मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली आहे.
पालकमंत्री नितेश राणे यांनी या संदर्भात माहिती दिली दिली असून ते म्हणाले, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकी मध्ये मी सिंधुदुर्ग आणि कोकणच्या आंबा, काजू विषयी चर्चा घडवून आणली. एकंदरीत आंबा – काजू ची परिस्थिती अशी आहे की या वर्षीचा हंगाम पाहता आंबा गळून पडला आहे. याबाबत ची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पूर्ण मंत्रिमंडळासमोर मांडली. माझे म्हणणं ऐकल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी मंत्रालयाचे सचिव आहेत. त्यांना मुख्यमंत्र्यांनी याबाबतच्या परिस्थिची माहिती घेण्यास सांगितली आहे. या एकंदरीत अभ्यासानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आंबा बागायतदारांच्या संदर्भात एक बैठक लवकरात लवकर घेतली जाईल. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरात लवकर निर्णय घेण्याच्या दृष्टीकोनातून निर्देश दिलेले आहेत.
राज्य सरकार म्हणून आंबा बागायतदारांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहणार आहोत.लवकरात लवकर मदत देण्याच्या दृष्टिकोनातून आमचं काम सुरू झालेल आहे. अशी माहिती मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

error: Content is protected !!