नेरूर मध्ये मोबाईल लोकअदालतीला उत्स्फूर्त प्रतिसाद

१८ पैकी ३ प्रकरणे तडजोडीने निकाली

न्याय तुमच्या दारी, विधी सेवा प्राधिकरणाचे योजने अंतर्गत ग्रामपंचायत नेरुर येथे झालेल्या मोबाईल लोकअदालतीला लोकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. कुडाळ दिवाणी न्यायाधीश जी. एस. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या लोक अदालतीत १८ पैकी ३ प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली.
महाराष्ट राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग यांचे निर्देशानुसार दिवाणी न्यायालय तथा तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघटना कुडाळ यांचे संयुक्त विदयमाने दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ ते दिनांक ६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मोबाईल व्हॅन मार्फत लोक अदालत तसेच जन जागु्ती शिबीरांचे नियोजीत कार्यक्रमातील लोकअदालत दिनांक ६ फेब्रुवारी २०२६ रोजी कुडाळ तालुक्यातील मौजे ग्रामपंचायत नेरुरचे आवारात तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश कुडाळ जी. ए. कुलकर्णी यांच्या अध्यक्षेतेखाली व वकील आर. डी. बिले, वकील एस. जी. मळगांवकर, ग्रामपंचायत अधिकारी अश्विनी कुंभार, ग्रामपंचायत वरीष्ठ लिपीक प्रकाश सांवत यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
मोबाईल व्हॅन लोकअदालतीमध्ये नेरुर गावची दिवाणीकडील १३ प्रकरणे व फौजदारी कडील ५ प्रकरणे मिळूण एकूण १८ प्रलंबीत प्रकरणे ठेवण्यात आलेली होती. या प्रकरणांपैकी दिवाणीकडील १ प्रकरण व फौजदारीकडील २ प्रकरणे मिळूण एकूण ३ प्रलंबीत प्रकरणे आपआपसात तडजोडीने निकाली निघाली. लोकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
या मोबाईल व्हॅन लोकअदालतीच्या पॅनलवर पॅनल प्रमुख म्हणून जी. ए. कुलकर्णी दिवाणी न्यायाधीश कुडाळ व पॅनल सदस्य म्हणून वकील आर. डी. बिले, तसेच लघुलेखक गेड ३ एल डी सावंत, वरीष्ठ लिपीक एम बी भाटकर व चपराशी एम एस प्रभु यांनी काम पाहिले. लोकअदालतीचे नियोजन तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश कुडाळ जी ए कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आर. टी. आरेकर वरीष्ठ लिपीक यांनी केले.

error: Content is protected !!