कणकवली मधील सखी मतदान केंद्रांवर जिल्हाधिकारी यांची भेट

मतदानाचा घेतला आढावा
कणकवली तालुक्यातील कलमठ कुंभारवाडी शाळा या ठिकाणी बनविण्यात आलेल्या सखी मतदान केंद्रावर सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज भेट देत आढावा घेतला. सखी मतदान केंद्राच्या माध्यमातून निवडणूक विभागाने गेले काही निवडणुकांमध्ये असा वेगळा उपक्रम हाती घेतला असून, मतदान केंद्रावर देखील अधिकारी व कर्मचारी गुलाबी रंगाच्या साड्या परिधान करून या मतदान केंद्राचे एक वेगळेपण जपले जात आहे. यावेळी त्यांच्यासोबत निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी जगदीश कातकर तहसीलदार दीक्षांत देशपांडे महसूल अधिकारी मनीषा बोडके आदी उपस्थित होते.





