समाजाची सर्वांगीण प्रगती करायची असल्यास उत्तम शिक्षण आवश्यक! – शांताराम गोवळकर,समाजसेवक

आदर्श शिक्षण समिती मुंबई तर्फे आयोजित केलेल्या विध्यार्थी गुणगौरव समारंभ प्रसंगी समाजाची प्रगती करण्याची असल्यास उत्तम शिक्षण घेणे आवश्यक असून त्यातून पुढे नोकरी मिळाल्यास संस्थेसाठी योगदान देवून संस्था आर्थिक प्रगती पथावर नेणे गरजेचे आहे.असे मत आदर्श शिक्षण समितीचे तहहयात विश्वस्थ व समाजसेवक शांताराम गोवाळकर यांनी व्यक्त केले. ते आदर्श शिक्षण समिती मुंबई च्या ६५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा व विद्यार्थी गुणगौरव सोहळा कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून बोलत होते.
आदर्श शिक्षण समिती ,मुंबई यांच्या वतीने पहिली ते महाविद्यालयीन परिक्षेत यशस्वीरीत्या उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती व पारितोषिके वितरण व सत्कार समारंभ आणि संस्थेची ६५ वी वार्षिक सर्वसाधारण सभेचे रविवार ता.११ रोजी संध्याकाळी ५ वाजता श्रीमती शिवराजवती ओंकारनाथ आर्यसमाज सभागृह लोअर परेल-मुंबई येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर आदर्श शिक्षण समितीचे अध्यक्ष सुरेश पवार, उपाध्यक्ष अनंत दाभोळकर, सरचिटणीस भारत पाटणकर, कोषाध्यक्ष राजाराम पवार, प्रा.माधुरी घार्गे काळभोर, दत्ताराम दळवी, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना श्री गोवळकर पुढे म्हणाले की विध्यार्थ्यांनी सुयश संपादन केल्यानंतर त्यांना योग्य नोकरी मिळाल्यास त्यांनी संस्थेकडे लक्ष देणे आवश्यक आहे. अर्थात त्यांना जमेल तशी संस्थेची सेवा करावी जेणेकरून संस्था अधिक आर्थिक प्रगती पथावर जाईल याकडे जाणीव पुर्वक लक्ष दिले पाहिजे. त्यानंतर संस्थेचे माजी खजिनदार व सल्लागार हरीश केळकर निवृत्त उपायुक्त आयकर, रमेश पवार – सहाय्यक अधिकारी व प्रकाश पवार मुंबई पोर्टचे अधिकारी तसेच सर्व गुणवंत विद्यार्थी यांचे अभिनंदन केले.यावेळी संस्थेच्या वतीने शांताराम गोवळकर यांचा शाल,श्रीफळ ,व पुष्पगुच्छ देवून अध्यक्ष सुरेश पवार यांचे हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच पहिली ते महाविद्यालयीन परिक्षेत यशस्वीरीत्या उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती,रोख रक्कमेचे पारितोषिक व शैक्षणिक साहित्य देवून मान्यवराच्या हस्ते गौरव करण्यात आला. श्री गोवळकर यानी सत्काराला उत्तर देताना संस्थेच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद दिले. यावेळी हरीश केळकर , सुरेश केळकर, प्रा. माधुरी घार्गे व दत्ताराम दळवी यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले.प्रास्ताविक अध्यक्ष सुरेश पवार यानी केले. यावेळी संस्थेच्या ६५ व्या सर्वसाधारण सभेचे कामकाज पार पडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत दाभोळकर यांनी केले तर उपस्थित मान्यवर,व विद्यार्थी, पालक यांचे आभार सरचिटणीस भारत पाटणकर यानी मानले.
कृपया फोटोसह प्रसिद्ध करणे
मुंबई – १) आदर्श शिक्षण समिती मुंबईच्या पहिली ते महाविद्यालयीन परिक्षेत यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थी गुणगौरव समारंभात संस्थेचे तहय्यात विश्वस्त शांताराम गोवळकर यांचा शाल,श्रीफळ,व पुष्पगुच्छ देवून सन्मान करताना आदर्श शिक्षण समितीचे अध्यक्ष सुरेश पवार सोबत, उपाध्यक्ष अनंत दाभोळकर , सरचिटणीस भारत पाटणकर, कोषाध्यक्ष राजाराम पवार,प्रा.माधुरी घार्गे,दत्ताराम दळवी आदी मान्यवर
२) आदर्श शिक्षण समिती मुंबईच्या पहिली ते महाविद्यालयीन परिक्षेत यशस्वीरीत्या उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थी सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन सन्मानित करताना संस्थेचे तहय्यात विश्वस्त शांताराम गोवळकर सोबत अध्यक्ष सुरेश पवार, उपाध्यक्ष अनंत दाभोळकर, सरचिटणीस भारत पाटणकर, कोषाध्यक्ष राजाराम पवार,प्रा माधुरी घार्गे,दत्ताराम दळवी आदी मान्यवर






