भजनमहर्षी चिंतामणी पांचाळ बुवांचा १२ वा पुण्यस्मरण सोहळा संपन्न होणार!

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजन क्षेत्रातील दैदीप्यमान नाव, गुरुवर्य भजनमहर्षी वैकुंठवासी चिंतामणी पांचाळ बुवा यांचा १२ वा पुण्यस्मरण दिन आणि त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारलेल्या ‘स्वरचिंतामणी’ स्मारकाचा प्रथम वर्धापन दिन सोहळा येत्या रविवार, १८ जानेवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.
भरणी (ता. कुडाळ) येथील बुवांच्या निवासस्थानी हा भावपूर्ण सोहळा आयोजित करण्यात आला असून, यानिमित्ताने दिवसभर विविध धार्मिक आणि सांगीतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
सोहळ्याचे विशेष आकर्षण: ‘अखंडित भजन पुष्पांजली’
भजनमहर्षींच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी सकाळी १०:३० वाजल्यापासून ‘व्यासपीठिय कार्यक्रम’ आणि त्यानंतर ‘अखंडित भजन पुष्पांजली’ अर्पण केली जाणार आहे. कोकणातील दिग्गज भजनी कलाकार आणि रसिक या सोहळ्याला उपस्थित राहून स्वरांजली अर्पण करणार आहेत.
सकाळी ९:३० वा: गुरूंच्या प्रतिमेचे पूजन
सकाळी १०:३० वा: व्यासपीठिय कार्यक्रम
सकाळी ११:३० पासून: अखंडित भजन पुष्पांजली
दुपारी १:३० वा: महाप्रसाद (स्नेहभोजन) अशी या कार्यक्रमाची रूपरेषा असल्याची माहिती स्मारक समिती अध्यक्ष बुवा निलेश ठाकूर यांनी दिली आहे.या कार्यक्रमास सर्व भजनरसिक आणि भजनी कलाकारांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिष्यपरिवार व बुवा योगेश पांचाळ कुटुंबियांतर्फे करण्यात आले आहे.





