साकेडीत 14 जानेवारी रोजी वारकरी दिंडी भजन स्पर्धेचे आयोजन

नामवंत निमंत्रित भजन संघाचा असणार सहभाग

स्पर्धेचे सलग आहे आठवे वर्ष

कणकवली तालुक्यातील साकेडी येथील श्री देव चव्हाटा मंदिराच्या समोर जिल्हास्तरीय “वारकरी दिंडी भजन स्पर्धा” आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे बुधवार, १४ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता उद्घाटन होणार आहे. वारकरी परंपरेचा जागर करत भक्ती, अभंग व भजनाच्या माध्यमातून विठुरायाच्या नामस्मरणाचा हा सोहळा रंगणार आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड हे प्रमुख उपस्थित असणार आहेत. भजन स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भागांतील निमंत्रित भजन मंडळांचा सहभाग असणार आहे. गेली आठ वर्ष ही स्पर्धा घेण्यात येत असून, स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भजन मंडळांसाठी प्रथम पारितोषिक ७,००० व आकर्षक चषक, तर द्वितीय पारितोषिक रुपये ५,००० व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. उत्कृष्ट पखवाजवादक व उत्कृष्ट गायक यांनाही विशेष पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत.
स्पर्धेचे आयोजन साकेडीतील भजनप्रेमी ग्रामस्थ व श्री वाळकेश्वर नवतरुण प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी सागर राणे 9420760256 व रुपेश मेस्त्री 957952 9746 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!