बाबा वर्दम नाट्य महोत्सवामुळे कुडाळचं देशभर नाव – सुनील सौदागर

२८ व्या बाबा वर्दम स्मृती नाट्य महोत्सवाचा शुभारंभ

राज्यभरातून ७ निवडक नाटकांचे सादरीकरण होणार

बाबा वर्दम स्मृती नाट्य महोत्सवामुळे कुडाळचे नाव राज्यातच नव्हे तर पूर्ण देशभरात झालं आहे, असे गौरवोद्गार सारस्वत बँकेचे संचालक सुनील सौदागर यांनी काढले. येथील बाबा वर्दम थिएटर्स आयोजित २८ व्या बाबा वर्दम स्मृती नाट्य महोत्सवाला बुधवारी सायंकाळी सुरुवात झाली. महोत्सवाच्या शुभारंभ प्रसंगी श्री. सौदागर बोलत होते. ७ ते १३ जानेवारी पर्यंत चालणाऱ्या या नाट्य महोत्सवात निवडक ७ नाटके सादर होणार आहेत.
येथील बाबा वर्दम थिएयर्सच्या वतीने दरवर्षी ७ ते १३ जानेवारी दरम्यान नाट्य महोत्सव आयोजित केला जातो. यंदाच्या या २८ व्या नाट्य महोत्सवाचे उदघाटन बाबा वर्दम थिएटर्सच्या अध्यक्षा वर्षा वैद्य यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाले. डॉ. अनिल नेरूरकर यांनी नटराज पूजन तर सुनिल सौदागर यांनी बाबा वर्दम यांच्या प्रतिमेचे पूजन केले. कमशिप्र मंडळाचे उप कार्यध्यक्ष अरविंद शिरसाट यांच्या हस्ते रंगमंच पूजन करण्यात आले. यावेळी बाबा वर्दम थिएटर्सच्या अध्यक्षा वर्षा वैद्य, सारस्वत बँकेचे संचालक सुनील सौदागर, कमशीप्र मंडळाचे उप कार्यध्यक्ष अरविंद शिरसाट, बाबा वर्दम थिएटर्सचे संस्थपक चंदू शिरसाट, कार्यकारिणी सदस्य डॉ. संजीव आकेरकर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना सुनील सौदागर यांनी बाबा वर्दम स्मृती नाट्य महोत्सवाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. सातच नाटके सादर होत असली तरी आलेल्या 30-40 संहिता वाचून संघांच्या तालमी पाहून ७ नाटकांची निवड केली जाते हे कौतुकास्पद असल्याचे श्री. सौदागर यांनी सांगितले.
प्रसिद्ध डॉक्टर अनिल नेरुरकर यांनी देखील या नाट्य महोत्सवाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. बाबा वर्दम थिएटर्सने अनेक कलाकार घडविले आहेत असे सांगून त्यांनी थिएटर्सचे तरुण कलाकार साहिल देसाई आणि शोण घुर्ये यांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सुत्रसंचलन संस्थेचे कार्यवाह केदार सामंत यांनी केले. स्वागत सहकार्यवाह अनिल आचरेकर यांनी केले. उदघटना नंतर सावंतवाडीच्या नाट्य संस्थेने होनाजी बाळा हा नाट्यप्रयोग सादर केला.

error: Content is protected !!