युनिव्हर्सल शोतोकॉन कराटे-डो असोसिएशन ऑफ इंडिया आयोजित नॅशनल कराटे चॅम्पियन 2026 मध्ये शेठ न. म. विद्यालय खारेपाटण च्या विद्यार्थ्याचे उल्लेखनीय यश

युनिव्हर्सल शोतोकॉन कराटे-डो असोसिएशन ऑफ इंडिया आयोजित नॅशनल कराटे चॅम्पियन 2026 स्पर्धा सांगली जिल्ह्यातील जत येथे पार पडल्या. यामध्ये काता व कुमिते या दोन क्रीडा प्रकारात खारेपाटण हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.
या स्पर्धा रविवार दि – 04 जानेवारी 2026 रोजी गवि सिद्धेश्वर हॉल, जत अथणी रोड, जत ता. जत जि. सांगली येथे संपन्न झाल्या. यामध्ये खारेपाटण हायस्कूल मधील खालील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन यश संपादन केले.

  1. कुमार हर्ष तावडे इ. 8 वी सिल्व्हर मेडल (फाईट) गोल्डन मेडल (काता)
  2. कुमारी निधी शिवलकर इ. 6 वी सिल्व्हर मेडल (फाईट) सिल्व्हर मेडल (काता)
  3. कुमारी मनस्वी सकपाळ इ. 5 वी सिल्व्हर मेडल (फाईट)
  4. कुमार आर्यन कोवळे इ. 6 वी ब्राँझ मेडल (फाईट) ब्राँझ मेडल (काता)
  5. कुमारी मनस्वी राऊत इ. 5 वी ब्राँझ मेडल (फाईट) ब्राँझ मेडल (काता)
  6. कुमारी त्रिशा साळुंखे इ. 5 वी ब्राँझ मेडल (फाईट) ब्राँझ मेडल (काता)
  7. कुमारी सुखदा राऊत इ. 5 वी ब्राँझ मेडल (फाईट)
  8. कुमारी दृष्टी चव्हाण इ. 6 वी ब्राँझ मेडल (फाईट)
    यशस्वी सर्व विद्यार्थ्यांना कराटेपट्टू श्री. युवराज राठोड यांचे मार्गदर्शन लाभले.
    सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेच्या वतीने खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष श्री. रघुनाथ राणे, सचिव श्री. महेश कोळसुलकर, सर्व विश्वस्त, प्रशालेचे प्राचार्य श्री. संजय सानप, पर्यवेक्षक श्री. संतोष राऊत सर्व शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले.
error: Content is protected !!