राष्ट्रीय कला उत्सव स्पर्धेत शेठ. न . म. विद्यालयातील विद्यार्थ्यानी देशात प्रथम क्रमांक प्राप्त केल्यामुळे मुख्याध्यापक संजय सानप यांचा सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघातर्फे सत्कार

शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय भारत सरकार, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन परिषद, नवी दिल्ली व राज्य शैक्षणिक संशोधन परिषद, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कला उत्सव स्पर्धेत देशात प्रथम क्रमांक प्राप्त करून सिंधुदुर्ग जिल्ह्याला राष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळवून देणाऱ्या शेठ न. म. विद्यालय खारेपाटण व ज्युनिअर कॉलेज खारेपाटण चे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. राष्ट्रीय स्तरावर पार पडलेल्या या कला उत्सव स्पर्धेत खारेपाटण हायस्कूल च्या संगीत विभागातील विद्यार्थ्यांनी सर्वोत्कृष्ट सादरीकरण करून सिंधुदुर्ग तसेच महाराष्ट्र राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. खारेपाटण हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या या यशामध्ये खारेपाटण कॉलेजचे प्राचार्य श्री. संजय सानप यांचे योगदान व मार्गदर्शन अत्यंत मोलाचे आहे. याचीच दखल घेऊन सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघातर्फे प्राचार्य श्री. संजय सानप यांचा भव्य सत्कार समारंभ दिनांक 02 जानेवारी 2026 रोजी ओरोस येथे संपन्न झाला. या सत्कार समारंभासाठी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री. तर्फे सर, उपाध्यक्ष श्री. हनुमंत वाळके सर, व श्री. रवींद्र सावंत, विषय समिती अध्यक्ष श्री. सरवणकर सर, उपशिक्षणाधिकारी श्रीमती. आवटी मॅडम व सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.





