दर्जा न राखता जानवली मधून पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे काम होता नये

माजी जि. प. उपाध्यक्ष रंजन राणे यांच्यासह सरपंच ग्रामस्थांचा अधिकाऱ्यांना इशारा

लेखी आश्वासन द्या व कामे मार्गी लावा

पंतप्रधान ग्राम सडक रस्त्याचे काम करत असताना अंदाजपत्रकामध्ये अनेक बाबींचा समावेश केलेला नाही. प्रत्यक्षात ही कामे या रस्त्यावर होण्याची गरज आहे. परंतु दोन वर्षांपूर्वी झालेल्या रस्त्यावर पुन्हा सोलिंग केल्याचे दाखवून हा रस्ता केला जात असेल तर या चुकीच्या पद्धतीने निधी खर्च करण्याला आमचा विरोध आहे. जनतेच्या सोयीच्या दृष्टीने रस्त्याचे काम व्हायला हवे. याबाबत जी आश्वासने देता ती स्पष्ट लेखी पत्रावर द्या अशी मागणी करत जानवली साकेडी रस्त्याच्या कामाबाबत माजी जि. प. उपाध्यक्ष रंजन राणे यांच्यासह ग्रामस्थांनी पंतप्रधान ग्रामसडक चे उप अभियंता प्रदीप भोसले व ठेकेदार यांना धारेवर धरले.
जानवली साकेडी इतर जिल्हा मार्ग या रस्त्याच्या कामाची पंतप्रधान ग्रामसडक योजना यामधून रुंदीकरण व डांबरीकरण मजबुतीकरण अशी कामे हाती घेण्यात आली आहेत. हे काम करत असताना जानवली महामार्गावर सखलवाडी मार्गे जाणारा रस्ता रुंदीकरण व मजबुतीकरण केला जात आहे. मात्र हे करत असताना ठेकेदाराकडून चुकीच्या पद्धतीने काम केला जात असल्याचा आरोप रंजन राणे व ग्रामस्थांनी केला. या मार्गावर जे अपघातग्रस्त ठिकाने आहेत अशा वळणांवर रुंदीकरण करण्याची गरज आहे. तसेच जानवली साटमवाडी या ठिकाणी नऊ मोऱ्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र याकरता रिटर्निंग वॉल बांधताना एकाच बाजूने बांधली जात आहे. रस्त्याची रिटर्निंग वॉल करत असताना दोन्ही बाजूने हे काम झाले पाहिजे. जेणेकरून रस्ता भविष्यात कोसळणार नाही व अपघात घडणार नाही. असे असताना या कामांकडे दुर्लक्ष केला जात असल्याचा आरोप राणे यांनी केला. यावेळी श्री भोसले यांनी ही कामे केली जातील असे सांगितले. मात्र आम्हाला नुसते तोंडी आश्वासन नको ग्रामपंचायत मध्ये याबाबतची बैठक घ्या व लेखी आश्वासन द्या अशी मागणी रंजन राणे यांच्यासहित सरपंच अजित पवार, उपसरपंच किशोर राणे आदींनी केली. ज्या ठिकाणी रस्त्याचे काम सोलिंग सहित मजबुतीकरण करण्यात आले आहे. या ठिकाणचा दोन वर्षांपूर्वी केलेला रस्ता सुस्थितीत आहे. मात्र हे सोलिंग न करता त्यात रस्त्यावर डांबरीकरण करण्याचा घाट घातला जात आहे. असे मलमपट्टीचे काम होता नये. अंदाजपत्रकामध्ये जर या रस्त्याचे सोलिंग धरले असेल तर खराब झालेला पहिला रस्ता खोदून हे सोलिंग नव्याने करा अशी मागणी राणे यांनी केली. या रस्त्या अंतर्गत ज्या भागामध्ये पावसाळ्यात पाणी साचण्याचा प्रकार घडतो अशा ठिकाणी रस्त्याची उंची वाढवली पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली. तर रस्त्याच्या कामाची पंधरा वर्षे देखभाल दुरुस्ती ठेकेदाराकडे असल्याचे भोसले यांनी सांगितले. मात्र आम्हाला देखभाल दुरुस्ती किती वर्ष करणार हे नको. आता करतानाच रस्ता दर्जेदार करा अशी मागणी सरपंचांसहित ग्रामस्थांनी केली. याबाबत ग्रामपंचायत मध्ये एकत्रित बैठक घ्या व बैठक घेऊनच पुढील काम करा. अन्यथा याबाबत पालकमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात येणार असल्याची ही सांगण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रंजन राणे, सरपंच अजित पवार, उपसरपंच किशोर राणे, निखिल साटम, उदय राणे, सतीश सावंत, ठेकेदार, बुवा शशिकांत राणे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!