पोलीस रेजिंंग डे निमित्त आयोजित शुटींगबाॅल स्पर्धेत शिवरामेश्वर आचरा तर थ्रीपासींग मध्ये त्रिंबक रामेश्वर संघ प्रथम

पोलीस रेजिंंग डे निमित्त आचरा पोलीसस्टेशन तर्फे आयोजित शुटींगबाॅल स्पर्धेत शिवरामेश्वर आचरा तर
थ्रीपासींग शुटींग बाॅल मध्ये त्रिंबक रामेश्वर संघाने प्रथम क्रमांक मिळविला. आचरा पिरावाडी येथे झालेल्या या स्पर्धेत सहा संघानी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेचा शुभारंभ आचरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदिप पोवार यांच्या हस्ते झाले. यावेळी जनता विद्यामंदिर त्रिंबकचे चेअरमन सकपाळ, पोलीस स्टेशनचे मिलिंद परब, हेमंत पेडणेकर, मनोज पुजारे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेच्या ट्रॉफी सचिन माणगांवकर दहिबाव यांच्या मार्फत देण्यात आल्या.





