कणकवली बाजारपेठे मधील पोल वरील तारा काढून त्या ठिकाणी “एबीसी” केबल

कणकवली शहरात “त्या” धोकादायक ठिकाणच्या तारा काढून केबल बसविणार
शहरात 2 किलोमीटर भागातील काम प्राधान्यक्रमाने करणार
कणकवली शहरातील काही महत्त्वाच्या ठिकाणी इमारतींना चिकटून जाणाऱ्या विद्युत तारा आता काढून त्या ठिकाणी एरियल बंच कंडक्टर म्हणजेच एबीसी केबल जोडण्यात चे काम कणकवली शहरात घेण्यात येणार आहे. महावितरण च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कणकवली शहरामध्ये आरडीएसएस योजनेअंतर्गत एलटी लाईन वर हे काम करण्यात येत असून आतापर्यंत कणकवली पटवर्धन चौक ते बाजारपेठेतील 10 पोलांवरची इमारतीला चिटकून जाणाऱ्या तारा काढून या ठिकाणी केबल बसविण्यात आली आहे. कणकवली शहरातील जनतेमधून या कामाबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.
आरडीएसएस या योजनेतून कणकवली शहरा करिता अशा धोकादायक स्थितीमध्ये असलेल्या एलटी पोल वरील विद्युत तारा बदलून त्या ठिकाणी एरियल बंच कंडक्टर केबल बसविण्याचे काम मंजूर आहे. या कामाची प्रत्यक्ष सुरुवात कणकवली शहरामध्ये करण्यात आली असून, कणकवली शहरातील प्रमुख वर्दळीच्या ठिकाणी इमारतींना व इमारतीच्या गॅलरीला चिकटणाऱ्या तारा या काढून त्या ठिकाणी या केबल बसविण्यात येत आहेत. काही ठिकाणी मोठी असलेली झाडे व या झाडांना पूर्णपणे चिकटणाऱ्या विद्युत तारा या काढून त्या ठिकाणी ही केबल लावण्याचे काम लवकरच हाती घेतले जाणार असल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. कणकवली मधील कापड व्यापारी माधव शिरसाट यांनी या प्रश्नी अनेकदा महावितरण च्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर काही दिवसातच ही काम मार्गी लावण्यात आले आहे. महावितरणच्या कामाबद्दल त्यांनी देखील समाधान व्यक्त केले आहे.





