कुडाळात रोटरी फेस्टिव्हलची जय्यत तयारी ; आज उद्धाटन

आमदार निलेश राणे आणि जिल्हाधिकारी तृप्ती धोडमीसे राहणार उपस्थित

रोटरी क्लब ऑफ कुडाळ आयोजित वामन हरि पेठे ज्वेलर्स प्रस्तुत रोटरी इंडस्ट्रियल फूड व ऑटो एक्स्पो फेस्टिव्हलची जय्यत तयारी सुरू आहे. आमदार निलेश राणे व जिल्हाधिकारी तृप्ती धोडमीसे यांच्या उपस्थितीत 29 डिसेंबर रोजी सायंकाळी 7.00 वा कुडाळ हायस्कूल मैदानावर उद्घाटन होणार आहे. अशी माहिती फेस्टिव्हल प्रमुख सचिन मदने व रोटरी अध्यक्ष राजीव पवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
रोटरी फेस्टिव्हल 29, 30 व 31 डिसेंबर रोजी कुडाळ हायस्कूल मैदानवर होणार असून या फेस्टीव्हलचे उद्घाटन 29 डिसेंबर रोजी सायंकाळी 7.00 वा होणार आहे. उद्घाटक म्हणून कुडाळ मालवण विधानसभा आमदार निलेश राणे उपस्थित राहणार आहेत, तर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 माजी गव्हर्नर संग्राम पाटील, सारस्वत बँकचे संचालक अनिल आंबेसकर, कुडाळ नगराध्यक्ष सौ. प्राजक्ता शिरवलकर, डिस्ट्रिक्ट सेंक्रेटरी प्रणय तेली, असिस्टंट गव्हर्नर डाॅ. प्रशांत कोलते व विनया बाड, प्रसिद्ध संगितकार विजय गवंडे, पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
उद्घाटन झालेनंतर लहान मुलांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा होणार आहे. वयोगट 5 ते 11 व 12 ते 16 राहणार असून मर्यादित 30 स्पर्धकांचीच स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेला परिक्षक म्हणून निलेश जोशी व भूषण तेजम उपस्थित राहणार आहेत.
नृत्य, हास्य आणि सुरांचा संगम कार्यक्रमात सुर नवा ध्यास नवा फेम निखिल मधाळे, झी युवा सिंगर फेम ब्रम्हनंदा पाटणकर व हर्षद मेस्त्री असणार आहेत. विनोदाचा बादशाहा व निवेदक दिव्येश शिरवंडकर असणार आहे. चिमणी पाखरं डान्स ॲकॅडमी कलाकारांचे बहारदार ग्रुपडान्स होणार आहेत.

दोन नव्या गाड्यांचे अनावरण

रोटरी फेस्टिव्हलच्या ऑटो एक्स्पो मध्ये एमजी कंपनी व बीवायडी कंपनी अशा दोन कंपन्यांच्या दोन नव्या गाड्यांचे अनावरण आमदार निलेश राणे यांचे हस्ते होणार आहे. निवेदक बादल चौधरी असणार आहे.

संपूर्ण फेस्टिव्हल कॅमेऱ्याच्या नजरेखाली

यावर्षीचा रोटरी फेस्टिव्हल सीसीटीव्ही कॅमेराच्या नजेरेखाली असणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा आयोजकांकडून बसविण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग पोलिसांचा स्वतंत्र कक्ष

रोटरी फेस्टिव्हल मध्ये सिंधुदुर्ग पोलिसांचा स्वतंत्र कक्ष असणार असून यामध्ये सायबर क्राईम, ट्राफीक नियम जनजागृती, पाॅक्सो कायदा जनजागृती करण्यात येणार आहे. पोलिस बॅन्डपण असणार आहे.
लहान मुलांसाठी भव्यदिव्य पाळणा, ट्रेन, डान्सिंग रोल, बोट, टू व्हिलर रिंग, मिकी माऊस अशी विविध प्रकार असणार आहेत.

error: Content is protected !!