वाघेरी वासीयांच्या विकासाच्या मागण्या यापुढेही पूर्ण करणार

शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांचे आश्वासन
विविध विकासकामांचे करण्यात आले लोकार्पण
शिवसेना उपनेते संजय आग्रे यांच्या उपस्थितीत वाघेरी येथील रस्ते व बोअरवेल विकासकामांचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले.
वाघेरी गावातील वाघेरी लिंगेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता, वाघेरी चव्हाटा ते सदानंद गुरव यांच्या घराकडे जाणारा रस्ता तसेच महेश पाटील यांच्या घराजवळील बोअरवेल या विकासकामांचे लोकार्पण शिवसेना उपनेते व माजी जिल्हा परिषद सदस्य संजय आग्रे यांच्या उपस्थितीत पार पडले.
या कार्यक्रमास शिवसेना विधानसभा प्रमुख व माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती श्री. संदेश पटेल, सरपंच सौ. अनुजा रावराणे, माजी सरपंच श्री. संतोषजी रावराणे, माजी सरपंच श्री. तुकाराम गुरव, पोलीस पाटील श्री. अनंत रावराणे, पोलीस पाटील श्री. अजिंक्य गुरव, उपसरपंच सौ. नेवगे मॅडम, श्री. मंगेश नेवगे, श्री. किशोर राणे, श्री. सुहास रावराणे, श्री. महेंद्र रावराणे, श्री. सिद्धेश रावराणे, श्री. दिनेश रावराणे, श्री. सत्यवान गुरव, प्रणय सावंत, श्री. सचिन राणे, श्री. चंद्रकांत गुरव, महेश पाटील, बाळा रावराणे, श्री. नितीन रावराणे, शरद सावंत, प्रसाद राणे, राजा राणे, श्री. देवगडकर, श्री. शुभम रावराणे तसेच ग्रामपंचायत सदस्य व वाघेरी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकार्पण कार्यक्रमावेळी बोलताना संजय आंग्रे म्हणाले, “या गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी नेहमीच तत्पर आहे.” तसेच ग्रामस्थांच्या मागणीनुसार त्यांनी वाघेरी शाळेला भेट दिली, जिथे श्री. पाताडे सर, श्री. राणे सर व सर्व शिक्षकवर्गाने त्यांचे स्वागत केले. यावेळी बोलताना आग्रेसाहेबांनी शाळेसाठी आवश्यक असलेल्या सुविधा पूर्ण करण्याचेही आश्वासन दिले. तसेच शाळेतील मुलांना, खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
सर्व मान्यवर, पदाधिकारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये हा लोकार्पण कार्यक्रम अत्यंत उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडला.





