चेंदवण विद्यालयात दोन दिवसीय अभिनय कार्यशाळेला उत्साही प्रतिसाद

डॉ. अवधूत भिसे, केदार देसाई आणि निलेश जोशी यांचे मार्गदर्शन

चेंदवण शिक्षणोत्तेजक मंडळ, मुंबई संचलित, श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय, चेंदवण येथे दोन दिवसीय अभिनय कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
दिपप्रज्वलन करून कार्यशाळेची औपचारिक सुरुवात करण्यात आली. शुभारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था उपाध्यक्ष शरद शृंगारे होते. यावेळी व्यासपीठावर संस्था सदस्य संजय नाईक, अभिनय कार्यशाळा मार्गदर्शक केदार देसाई, निलेश जोशी, मुंबईहून विशेष उपस्थित असलेले डॉ. अवधूत भिसे, गोविंद भरडकर, मुख्याध्यापक माणिक पवार, पालक प्रतिनिधी दादा करलकर, तसेच कवठी पोलीस पाटील विठ्ठल राणे उपस्थित होते.
या कार्यशाळेत चेंदवण हायस्कूल, चेंदवण प्राथमिक शाळा व कवठी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. प्रारंभी दीपप्रज्वलन करण्यात आले. चेंदवण हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सुस्वरात ईशस्तवन व स्वागतगीत सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. मान्यवरांचा सत्कार संस्था उपाध्यक्ष शरद शृंगारे यांच्या हस्ते करण्यात आला. विशेष म्हणजे सदर कार्यशाळा स़ंस्थेने विनामुल्य आयोजित केली होती. सूत्रसंचालन उर्मिला गवस यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक माणिक पवार यांनी केले.
यानंतर प्रत्यक्ष अभिनय कार्यशाळेला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी पहिले सत्र केदार देसाई, दुसरे सत्र निलेश जोशी तर तिसरे सत्र अवधूत भिसे यांनी घेतले. विद्यार्थ्यांचा उत्साह इतका प्रचंड होता की संध्याकाळी साडेपाच वाजताही कार्यशाळा सुरूच ठेवावी असे वातावरण निर्माण झाले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी कीर्ती सांगळे यांनी कार्यशाळेची सुरुवात केली. त्यानंतर दुसरे सत्र अवधूत भिसे यांनी घेतले. सायंकाळी समारोप कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
समारोपावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष शरद शृंगारे, डॉ. अवधूत भिसे, अशोक आठलेकर, मुख्याध्यापक माणिक पवार, संतोष सांगळे, विठ्ठल राणे, कवठीच्या सरपंच स्वाती करलकर, पालक प्रतिनिधी स्वाती राणे तसेच वालावल येथील पालक श्री. मार्गी उपस्थित होते. समारोपाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी आपले उस्फुर्त मनोगत व्यक्त केले. अशा प्रकारे पुन्हा कार्यशाळा आयोजित करावी अशी विनंती केली. समारोपाचे सूत्रसंचालन उमेश धर्णे यांनी केले.
ही अभिनय कार्यशाळा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी उपयुक्त ठरली असून मुलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आयोजकांनी समाधान व्यक्त केले.

error: Content is protected !!