हत्यार बंद स्थितीत जबरी चोरी करणारा आरोपी कणकवलीत जेरबंद

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची सापळा रचून कणकवलीत कारवाई

हत्यार बाळगून जबरी चोरीसारखे गुन्हे दाखल असलेला कुख्यात आरोपी राजन शंकर गमरे, वय 57, रा. कालिना, सुंदरनगर, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई याला स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने आज कणकवली रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतले. त्यास पुढील कार्यवाही करिता कणकवली पोलिस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे. कणकवली पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर 322/2025, BNS 2023 चे कलम 333, 309(5), 3(5) या गुन्ह्याचा स्था. गु. अ. शा. सिंधुदुर्ग यांचे मार्फतीने समांतर तपास चालू होता. तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहीतगाराकडून प्राप्त माहितीनुसार गुन्ह्य़ातील सदर आरोपी हा कणकवली येथे येणार असल्याची माहिती मिळाल्याने सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, यांच्या सुचनेनुसार पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ, सपोफौ/ राजु जामसंडेकर, पोलीस हवालदार आशिष गंगावणे, पोलिस हवालदार ज्ञानेश्वर तवटे,पोलिस हवालदार किरण देसाई यांनी केली आहे. फोंडाघाट येथे झालेल्या जबरी चोरी प्रकरणात या आरोपीचा सहभाग होता.

error: Content is protected !!