कणकवली नगरपंचायत च्या भाजपाच्या गटनेतेपदी सुप्रिया समीर नलावडे यांची निवड

9 नगरसेवकांच्या गट नोंदणीची प्रक्रिया आज पूर्ण

कणकवली नगरपंचायत च्या भाजपाच्या 9 नगरसेवकांच्या गटाची नोंदणी देखील आजच जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. भाजपाच्या कणकवली नगरपंचायत च्या गटाच्या गटनेतेपदी सुप्रिया समीर नलावडे यांची निवड करण्यात आली असून, आज जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत गट नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. कणकवली नगरपंचायत भाजपा गट असे नाव या गटाला देण्यात आले असून या गटामध्ये नगरसेवक राकेश राणे, स्वप्निल राणे, संजय कामतेकर, प्रतीक्षा सावंत, मेघा सावंत, मनस्वी ठाणेकर, आर्या राणे, मेघा गांगण व गटनेता सुप्रिया नलावडे यांचा समावेश आहे.

दिगंबर वालावलकर कणकवली

error: Content is protected !!