लागलेली पैज जिंकला, पण त्या पैशांच्या थैलीने मात्र बुचकळ्यात पडला!

चित्रपटाला साजेशी कणकवलीत जिंकलेल्या व हरलेल्या पैजीची गोष्ट

कणकवलीत ही पैज बनली चर्चेचा विषय

कणकवली नगरपंचायतची निवडणूक राज्यात लक्षवेधी ठरली व चर्चेचा विषय देखील बनली. या निवडणुकीत दोन्ही बाजूने सुरुवातीला दावे प्रति दावे केले जात होते. व या विजयाच्या दाव्या प्रतिदाव्यांमधूनच काही पैजा देखील लागल्या. काही पैजा या लागण्यापर्यंतच्या वाटेवर येऊन मोडून देखील पडल्या. पण याच पैजांमधील एक पैज सध्या कणकवली शहरात चर्चेचा विषय बनली आहे. कणकवली म्हटल्यानंतर त्या मध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये वेगळेपण हे येतेच. तसेच काही वेगळेपण या एकाने जिंकलेल्या व दुसऱ्याने हरलेल्या पैजी मध्ये पाहायला मिळाले. “गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा” हा चित्रपट विविध अंगाने त्यावेळी गाजला. कणकवलीतही याच चित्रपटांमधील एका सिन ला साजेशी अशी पैज लागली होती. पैजीसाठी प्रभाग क्रमांक होता 14 व पैज लावणारे देखील जरी परस्पर विरोधी पक्षांमध्ये असले तरी एकमेकांचे जवळचे मित्र. यापैकी मध्ये दोन्ही बाजूला आपआपले उमेदवार निवडून येणार यावर पैज लागली होती. यामध्ये पैज लावणारे देखील जिगरबाज व राजकारणाची आवड असणारे होते. त्यातील एक होता कणकवलीच्या राजकारणात “दिव्यदृष्टी” समजला जाणारा. तर दुसरा होता नजीकच्या एका गावचा प्रथम नागरिक. पैजीची रक्कम ही 5 हजार रुपये ठरली होती. कणकवलीच्या राजकारणातील दिव्यदृष्टी असनाऱ्याने आपल्याकडे जबाबदारी असलेल्या प्रभाग क्रमांक 14 मधील आपल्या पॅनलचा उमेदवार निवडून येणार हा दावा केला होता. व या करिता त्यांने आपल्याकडून 5 हजारांचा आकडा निश्चित केला होता. तर त्याच्या प्रतिस्पर्धी पक्षाच्या नजीकच्या गावच्या प्रथम नागरिकांने त्याच प्रभागातील कट्टर समर्थक असलेला उमेदवार निवडून येणार असा दावा करत त्याने देखील 5 हजार रक्कम पैजी करता निश्चित केली. हातात हात मिळवला. पैज लागली. पण निकाल जाहीर झाला व यातील नजीकच्या गावातील प्रथम नागरिक पैज हरला. तर “दिव्यदृष्टी” वाला जिंकला. अखेर पैसे देण्याची वेळ आली. बुधवारी संध्याकाळी ची वेळ ठरली. आणि पैज जिंकलेल्या त्या चानाक्षाच्या हाती अत्यंत खुबीने पैशांची पिशवी दिली. मात्र पाहतो तर काय या पिशवीत सर्व चिल्लार. 1 रुपया पासून ते अगदी 20 रुपया पर्यंत ची चिल्लर. जणू काही “गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा” चित्रपटामध्ये अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी उमेदवारी अर्ज भरताना अनामत रक्कम म्हणून जमा केलेले सुट्टे पैसे सर्वांच्या नजरेसमोर होतेच. जणू काही तोच चित्रपटाचा सीन या ठिकाणी घडला. आणि पैज हरलेल्या प्रथम नागरिकाने त्या “दिव्यदृष्टी” च्या हाती पैशांची दिलेली थैली ही मात्र पैजेमधील चर्चेचा विषय बनली. बोललेल्या शब्दाला दोन्ही जागणारे असल्याने पैज जिंकणारा मात्र या सुट्ट्या पैशांच्या थैलीने बुचकळ्यात पडला. तर प्रथम नागरिकाने पैजिचा दिलेला शब्द अशा प्रकारे पूर्ण केला. कणकवली शहरात या पैजिची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

दिगंबर वालावलकर कणकवली

error: Content is protected !!