रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर येथे १७ जानेवारी रोजी तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धा

श्री रामेश्वर सार्वजनिक वाचनमंदिर तर्फे शनिवारी १७ जानेवारी रोजी दुपारी २.३० वाजता १० ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी तालुका स्तरीय कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा कै. महादेव ठाकूर यांच्या स्मरणार्थ श्रीमती विजयालक्ष्मी ठाकूर यांनी पुरस्कृत केलेली आहे. यासाठी कोणतीही प्रबोधनात्मक कथा सादर करायची आहे. स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक ५००रु, द्वितीय ४००रु, तृतीय ३००रु, उत्तेजनार्थ तीन प्रत्येकी १००रु बक्षिसे देण्यात येणार आहेत. प्रथम येणाऱ्या १२ स्पर्धकांना प्रवेश असून नाव नोंदणी ची अंतीम तारीख १२ जानेवारी दुपारी दोन वाजेपर्यंत आहे. अधिक माहिती साठी ग्रंथपाल सौ. विनिता कांबळी ९४२१२६३३४६ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष बाबाजी भिसळे, कार्यवाह अर्जुन बापर्डेकर यांनी केले आहे.





