कणकवली नगरपंचायत निवडणुकीचा निकाल लांबला व मतदारांना मनस्ताप झाला!

काही उमेदवारांकडून मत कुणाला दिले याची मतदारांकडे चाचपणी

“लक्ष्मी दर्शन” झाले पण हा मनस्ताप सहन होईना

कणकवली नगरपंचायत ची निवडणूक नुकतीच पार पडली. आणि या निवडणुकीचा निकाल लांबला. त्याचा मनस्ताप मात्र सध्या काही प्रभागामधील मतदारांना सहन करावा लागत आहे. निकाल लांबल्यामुळे उमेदवार आपल्या विजयाची गणिते मांडत असताना काही उमेदवारांनी तर थेट मतदारांशी संपर्क साधून तुम्ही मला मतदान केलं का? अशी विचारणा करत आपले आकडे जुळवण्यास सुरुवात केली आहे. या दरम्यान मतदार व उमेदवारांमध्ये शाब्दिक खटके देखील उडाल्याची चर्चा आहे. व त्यामुळे मतदारांनी मात्र आमचा हक्क आम्हाला राखू द्या तुम्ही परेशान करू नका. अशा शब्दात देखील काहींना सुनावल्याची चर्चा कणकवली शहरात आहे. कणकवली नगरपंचायत निवडणूक ही अनेक पद्धतीने चर्चेत आली. या निवडणुकीत लक्ष्मी दर्शन मुळे तर उमेदवारांमध्ये प्रचंड उत्साह होता. तर मतदार देखील सुखावले होते. परंतु निवडणुकीचा निकाल लांबल्यामुळे हे सुखावलेले मतदार मात्र त्रस्त झाले आहेत. काही प्रभागांमधील उमेदवारांनी जर आपल्या विजयाची गणिते मांडण्याकरिता थेट मतदारांना संपर्क साधून विचारणा केली. आणि तुमचं मत मला पडलं तर शंभर टक्के मी विजयी होणार असे ठोकताळे देखील बांधले. परंतु उमेदवाराच्या सातत्याच्या या त्रासाने मतदारांमध्ये मात्र सध्या नाराजी असल्याची चर्चा कणकवली शहरात सुरू आहे. कणकवली शहरातील लक्षवेधी असलेल्या लढतीमधील काही प्रभागांमध्ये उमेदवारांकडून चाचपणी सुरू असताना मतदारांनी मात्र या मनस्तापामुळे निकाल लवकर जाहीर झाला असता तर निदान आमची सुटका तरी झाली असती अशा प्रतिक्रिया खाजगी मध्ये व्यक्त केली आहे. त्यामुळे कणकवली शहरातील या ठोकताळ्यांच्या चर्चा देखील जागोजागी रंगू लागल्या आहेत.

error: Content is protected !!