जिल्हास्तरीय कबड्डी पंच परिक्षेचा निकाल जाहीर

पराग वालावलकर प्रथम, आनंद बामणीकर द्वितीय तर संदीप शेळके व मिलींद निकम तृत्तीय

१४ रोजी सावंतवाडी मार्गदर्शन शिबीर

सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्यावतीने २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कबड्डी पंच परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. परिक्षेला ४१ जण बसले होते पैकी १०० टक्के निकाल लागून सर्वजण उत्तीर्ण झाले आहेत. ही परीक्षा कासार्डे येथील केंद्रावर झाली होती, परिक्षेत पराग नीलकुमार वालावलकर यांनी प्रथम, आनंद लक्ष्मण बामणीकर यांनी द्वितीय तर संदीप जनार्दन शेळके व मिलींद सुरेश निकम यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
उत्तीर्ण झालेल्या सर्व परीक्षार्थीचे व जिल्ह्यातील कार्यरत पंचाचे एक दिवसीय शिबीर रविवार, १४ डिसेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत जिमखाना सावंतवाडी जिमखाना हॉल येथे होणार आहे. सदर पंच शिबीर सर्वांना अनिवार्य असणार आहे. याच कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते जिल्हा पंच परीक्षा उत्तीर्णांना प्रमाणपत्र वितरण करण्यात येणार आहे.
परिक्षेत परेश नीलकुमार वालावलकर, भक्ती चंद्रकांत काणकेकर, संतोष अपना कांबळे, समर्थ सतीश तुळसकर, नीलेश बुधाजी फोंडेकर, ऋषिकेश शंकर खटावकर, जयेश सुनील फाटक, यशवंत सहदेव परब, सुरज सुभाष महाले, दीपक सुरेश चव्हाण, चंद्रकांत रामचंद्र काणकेकर, मंदार मनाहर डुंबरे, प्रसन्न विजयकुमार सावंत, विशाल विजय कदम, दिवाकर मोहन पवार, अनिलकुमार जयवंत जमदाडे, माधुरी रामदास खराडे, नवनाथ चंद्रकांत काणकेकर, प्रसाद पांडुरंग देसाई, संदेश गुरूनाथ पाठकर, वैष्णवी चंद्रकांत काणकेकर, पूजा गणेश पाताडे, सचिन बाळकृष्ण तेंडुलकर, महेश गुणाजी सावंत, वैष्णव विद्याधर सावंत, गौरव शरद सांडव, स्वप्नील संतोष महाले, भूषण सच्चिदानंद आंगचेकर, जानू बाबू पाटील, प्रियांका दिनानाथ कोरगांवकर, उमेश लबू पाटकर, गोरश विष्णू वायंगणकर, श्रीकांत हंकारे, अमिता अरविंद राणे, रूपेश गंगाराम बांदेकर, राधाकृष्ण श्रीधर परब, अंकुश जिवाजी पारकर हे उत्तीर्ण झाले आहेत.
उत्तीर्ण परिक्षार्थीचे सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनचे अध्यक्ष रुजारीओ पिंटो, उपाध्यक्ष व माजी आमदार अजित गोगटे, दिलीप रावराणे यांनी अभिनंदन केले आहे. रविवारी सावंतवाडीत होणाऱ्या पंच मार्गदर्शन शिबिराला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनुभवी व ज्येष्ठ राष्ट्रीय व राज्य पंच मार्गदर्शन करणार आहेत. सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनचे कार्यवाह दिनेश चव्हाण व खजिनदार मार्टिन अल्मेडा यांच्यासह इतर प – मुख या शिबिरास मार्गदर्शन करणार आहेत.

error: Content is protected !!