माकडांच्या उपद्रवाबाबत ठाकरे सेनेने घेतली वन विभागाची भेट

वनविभागाकडून सकारात्मक प्रतिसाद

कुडाळ शहरात माकडांच्या वाढलेल्या उपद्रवासंदर्भात कुडाळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आज वनविभागाची भेट घेण्यात आली. यावेळी कुडाळ शहरांत माकडांमुळे भात शेती, केळी नारळांचे होणारे नुकसान यासंदर्भात कुडाळ वन क्षेत्रपाल सावंत यांच्याशी चर्चा करण्यात आली. माकडांचा बंदोबस्त तात्काळ करावा अशी मागणी ठाकरे सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
माकडापासून होणाऱ्या त्रासाबाबत आवाज कुडाळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आज वनविभागाची भेट घेण्यात आली. कुडाळ शहरात सांगेर्डेवाडी, कुंभारवाडी,केळबाई वाडी व कवीलकट्टे भागात ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात माकडे वावरत आहेत त्या ठिकाणी तात्काळ माकड पकडण्याचे पिंजरे लावण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. त्याच प्रमाणे कुडाळ शहरातील माकडामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरपाई तात्काळ करून द्यावी अशी देखील आग्रही मागणी करण्यात आली या सर्व मागणीला वनक्षेत्रपाल कुडाळ सावंत यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, संदीप महाडेश्वर, अमित राणे, बाळा वेंगुर्लेकर, गुरुनाथ गडकर, रोहन शिरसाट, सुरेंद्र तेली, नागेश जळवी, दिनार शिरसाट, आपा राणे, प्रथमेश राणे, सुशील चिंदरकर, नितीन सावंत, संजय मसुरकर,प्रथमेश राणे, विशाल राणे व सांगडेवाडी येथील शेतकरी उपस्थित होते.

error: Content is protected !!