माकडांच्या त्रासाने कुडाळवासीय त्रस्त

उद्या ठाकरे सेना वेधणार वन विभागाचे लक्ष

कुडाळ शहरात विविध ठिकाणी होत असलेल्या माकडांच्या उपद्रवामुळे शेतकरी व कुडाळ शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. त्या संदर्भात गुरुवार दिनांक 4 डिसेंबर सकाळी 11 वाजता वनविभाग यांना निवेदन देण्यात येणार आहे.
यावेळी तालुकाप्रमुख राजन नाईक, शिवसेना कुडाळ शहर प्रमुख संतोष शिरसाठ, बाळा वेंगुर्लेकर, सुशील चिंदरकर, संदीप म्हाडेश्वर, अमित राणे,सत्यवान कांबळी, नितीन सावंत, गुरु गडकर, मेघा सुकी यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदन देऊन वनविभाग यांचे लक्ष वेधले जाणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवा सेना व महिला आघाडी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन नगरसेवक मंदार शिरसाठ यांनी केले आहे.

error: Content is protected !!