आयडियल इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवाचा दिमाखात शुभारंभ.

कणकवली/मयूर ठाकूर खेळ शरीराला तंदुरुस्त ठेवतात आणि शिस्त शिकवतात याच खेळातील कौशल्यांचे प्रदर्शन क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून पाहता येते. ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज वरवडे या प्रशालेत वार्षिक क्रीडा महोत्सव प्रारंभ झाला.
ज्ञानदा शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री मोहन सावंत सर, कार्याध्यक्ष श्री.बुलंद पटेल सर, मुख्याध्यापिका सौ.अर्चना देसाई मॅडम तसेच श्री.यज्ञेश शिर्के सर तसेच पीटीए मेंबर गोठणकर मॅडम,करंजेकर मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रीडा महोत्सवाची दीपप्रज्वलनाने सुरुवात झाली.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी लेझीम, योगा, डंबेल्स तसेच लाठीकाठी अशी प्रात्यक्षिके सादर केली. त्यानंतर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले.कु.ख़ुशी आमडोस्कर आणि कु.अनुष्का दळवी यांनी खेळाचे महत्व भाषणांमधून सांगितले.
या कार्यक्रमाला प्रशाला शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते
सूत्रसंचालन व आभार प्रशालेचे सहशिक्षक श्री हेमंत पाटकर सर यांनी मांडले

error: Content is protected !!