उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार निलेश राणेंची तोफ आज कणकवलीत धडाडणार

कणकवली शहरविकास आघाडीच्या प्रचारार्थ सायंकाळी कॉर्नर सभा
विरोधकांचा घेणार समाचार
राज्याचे उद्योग मंत्री व शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख उदय सामंत तसेच शिवसेनेची मुलुख मैदान तोफ व कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार निलेश राणे यांची आज कणकवली सायंकाळी 7.30 वाजता कणकवली शहर विकास आघाडीच्या प्रचारार्थ कॉर्नर सभा होणार आहे. कणकवली कांबळी गल्ली या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर यांच्या निवासस्थानासमोर सायंकाळी ही कॉर्नर सभा आयोजित करण्यात आली असून यावेळी कणकवली शहरातील जनतेला कणकवली शहर विकास आघाडीला विजयी करण्याबाबतची आवाहन करण्यात येणार आहे. या कॉर्नर सभेला कणकवली शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर यांच्यासह 17 ही प्रभागांमधील उमेदवार व शिवसेनेचे नेते राजन तेली, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन कणकवली शहर विकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.





