आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे मध्ये शिक्षकांच्या विविध भूमिका या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न

कणकवली/मयूर ठाकूर

शिक्षक हा एक पिढी घडवतो शिक्षकांच्या अनेक भूमिका आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षकाने या भूमिका कशा पार पाडाव्यात या विषयावर नुकतेच आयडियाल इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज वरवडे इथे मार्गदर्शनपर व्याख्यान पार पडले.
जेष्ठ व्याख्याते व समुपदेशक सानेगुरुजी कथमालेचे श्री पांडुरंग नाडकर्णी सर यांनी शिक्षकांच्या विविध भूमिका समजावून सांगितल्या. यामध्ये मार्गदर्शक प्रेरक आदर्श सुलभक अशा विविध भूमिका पार पाडताना येणाऱ्या समस्यांवर मात करत आनंदी शिक्षणाची गुरुकिल्ली त्यांनी दिली.
ज्ञानदा शिक्षण संस्था उपाध्यक्ष श्री.मोहन सावंत, कार्याध्यक्ष श्री.बुलंद पटेल आयडियलच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना देसाई यांच्या उपस्थितीत सर्वप्रथम नाडकर्णी सरांचा सन्मान करण्यात आला.
त्यानंतर सरांनी इयत्ता 11 वी 12 वी च्या विद्यार्थ्यांना ही अभ्यासाची तंत्रे व पद्धती यावर बहुमोल मार्गदर्शन केले
या प्रसंगी आयडियल इंग्लिश स्कूल चे सर्व शिक्षक व कॉलेज विद्यार्थी उपस्थित होते.
सूत्रसंचलन व आभार प्रशालेच्या शिक्षिका सौ.शीतल बांदल मॅडम यांनी मानले.

error: Content is protected !!