जुनिअर कॉलेज खारेपाटण मधील सहाय्यक शिक्षक व रोटरी क्लब ऑफ खारेपाटणचे रोटरियन श्री. अजय गुरसाळे यांच्याकडून डायस(Podium )व सहाय्यक शिक्षिका सौ. अमृते मॅडम यांच्याकडून स्टँड फॅन प्रशालेला भेट

रोटरी क्लब ऑफ खारेपाटण, या संस्थेमार्फत पंचक्रोशी मध्ये विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून रोटरी क्लब ऑफ खारेपाटणचे रोटरियन व खारेपाटण जुनिअर कॉलेजचे सहाय्यक शिक्षक श्री अजय गुरसाळे यांचेकडून रुपये २५०००/किमतीचे डायस (Podium) भेट स्वरूपात देण्यात आला. तसेच प्रशालेतील माध्यमिक विभागातील सहाय्यक शिक्षिका व रोटरियन सौ. अमृते मॅडम यांजकडून स्टँड फॅन प्रशालेसाठी भेट देण्यात आला. रोटरी क्लब खारेपाटण च्या सर्व सदस्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी कार्य नेहमीच केले जाते. रोटरी क्लब खारेपाटण च्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. याप्रसंगी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रवीणजी लोकरे उपाध्यक्ष श्री. भाऊ राणे,सचिव श्री. महेशजी कोळसुलकर,सर्व विश्वस्त रोटरी क्लब ऑफ खारेपाटण चे अध्यक्ष श्री दयानंद कोकाटे, प्राचार्य श्री. संजय सानप पर्यवेक्षक श्री. राऊत सर व सर्व शिक्षक कर्मचारी व रोटरी क्लब खारेपाटण चे सर्व रोटरियन यांनी श्री गुरसाळे सर व सौ अमृते मॅडम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.





