आचरा ग्रामपंचायत सदस्य मुझफ्फर मुजावर यांची कार्यतत्परता

पिरावाडी स्मशानभूमीत उभारले स्वखर्चाने पाच सोलर दिवे
पिरावाडी स्मशानभूमीत वीज नसल्याने ग्रामस्थांना रात्रीच्या वेळी त्रास सहन करावा लागत होता.याबाबत आचरा ग्रामपंचायतचे कार्यतत्पर सदस्य मुझफ्फर उर्फ चावल मुजावर यांनी ग्रामस्थांची समस्या ओळखून तातडीने पाच सोलर दिवे उपलब्ध करून दिल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. शुक्रवारी ग्रामस्थांच्या सहकार्याने ते स्मशानभूमीत उभे करण्यात आले.यावेळी पोलीस पाटील विठ्ठल धुरी, दर्शन तारी, नितीन तारी, श्रीकांत पराडकर, नारायण होडेकर, निशिकांत कांबळे,आदीत्य धुरी,जितू धुरी, रत्नाकर सारंग, किशोर तळवडकर,मोहन परब, दिनेश कांदळगावकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते. मुजावर यांनी दाखविलेल्या कार्यतत्परते बद्धल ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.





