खारेपाटण ज्युनिअर कॉलेज येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सिंधुदुर्ग तर्फे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर संपन्न

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सिंधुदुर्ग चे पोलीस उपअधीक्षक विजय पांचाळ यांचे विद्यार्थ्यांसाठीचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर गुरुवार दिनांक २१ नोव्हेंबर २०२५ रोजी खारेपाटण ज्युनिअर कॉलेजमध्ये चंद्रकांत पारीसा रायबागकर सभागृहामध्ये संपन्न झाले. यावेळी उपस्थित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक श्री. विजय चव्हाण यांचे प्रशालेच्या वतीने प्राचार्य श्री. संजय सानप यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी बोलताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी शालेय जीवनातच करावी व वरिष्ठ पदावर काम करण्याची जिज्ञासा जोपासावी असे मत व्यक्त केले. सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये स्पर्धा परीक्षांचे असणारे महत्त्व त्यांनी आपल्या ओघवत्या शैलीत विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे प्राचार्य श्री संजय सानप यांनी केले. यावेळी व्यासपीठावर अँटी करप्शन ब्युरो सिंधुदुर्ग चे पोलीस उपअधीक्षक श्री. विजय पांचाळ व त्यांचे सहकारी, प्रशालेचे प्राचार्य श्री. संजय सानप पर्यवेक्षक श्री. संतोष राऊत, व जुनिअर कॉलेज विभागातील सर्व शिक्षक वृंद व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याबद्दल माननीय श्री. विजय पांचाळ साहेब यांचे प्रशालेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

error: Content is protected !!