रामरक्षा स्तोत्र पठण स्पर्धेत लावण्या चव्हाण प्रथम

श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर आचरा आयोजित राम रक्षा स्तोत्र पाठांतर स्पर्धेत कुमारी लावण्या स्वप्नील चव्हाण हिने प्रथम क्रमांक मिळवला. द्वितीय क्रमांक भक्ती करूनाधन जोशी, तर तृतीय क्रमांक अद्वैत कौस्तुभ केळकर यांनी मिळविला. उत्तेजनार्थ ललित गुरव मनस्वी चव्हाण यांना गौरविण्यात आले या स्पर्धेचे परीक्षण उदय मेहंदळे व सौ उर्मिला सांबारी यांनी केले. बालदिन आणि स्वातंत्र्य सैनिक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधून संजय पाडावे अभिजीत जोशी, वैशाली सांबारी मंदार सरजोशी यांनी प्रायोजित केलेल्या या स्पर्धेची सुरुवात स्वातंत्र्य सैनिक भगवान बिरसा मुंडा यांची 150 वी जयंती साजरी करून करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बाबाजी भिसळे, देणगीदार संजय पाडावे मंदार सरजोशी, वाचनालयाचे उपाध्यक्ष अशोक कांबळी, कार्यवाह अर्जुन बापर्डेकर, वैशाली सांबारी, उर्मिला सांबारी, भिकाजी कदम, सांस्कृतिक समिती सदस्य क्रमिनी ढेकणे, श्रद्धा महाजनी, भावना मुणगेकर, शिक्षक, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे निवेदन विनिता कांबळे यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी महेश बापर्डेकर, समृद्धी मेस्त्री, स्वप्निल चव्हाण यांनी विशेष प्रयत्न केले.

error: Content is protected !!