तोरसे-गोवा येथील माऊली पंचायतनचा २७ ला वार्षिक जत्रोत्सव

तोरसे गोवा येथील माऊली पंचायतयतन देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव गुरुवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे.
त्यानिमित्ताने तेथील रवळनाथ मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी माऊली पंचायतन देवीचा ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू होईल. त्यानंतर प्रमुख मानकरी यांच्या उपस्थितीत श्री च्या पालखीची मिरवणूक, रात्री आठ वाजता दीपोत्सव, रात्री श्रींच्या पालखीची मंदिराभोवती मिरवणूक व रात्री अकरा वाजता नाईक मोचेमाडकर यांचे दशावतार नाटक होईल.
दुसऱ्या दिवशी सकाळी दहीकाला व देवीला अर्पण केलेल्या ओट्यांचे जाहीर लिलाव केल्यानंतर जत्रोत्सवची सांगता होईल. तरी या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे.





