भाजपा उमेदवाराला आमदार निलेश राणे राणेंनी दिल्या शुभेच्छा

कणकवलीत घडलेल्या प्रसंगामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या
दोघांमध्ये रंगला हास्यविनोद
कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 16 मधील शहर विकास आघाडी पॅनलच्या उमेदवाराच्या प्रचार कार्यालयाच्या शुभारंभाला आमदार निलेश राणे हे उपस्थित राहिले असता एकेकाळी त्यांच्यासोबत काम केलेले व भाजपाचे प्रभाग क्रमांक 16 मधील उमेदवार संजय कामतेकर यांची व निलेश राणे यांची आज भेट झाली. या प्रभागा मध्ये कामतेकर यांनी सुरू केलेल्या प्रचार कार्यालयाच्या ठिकाणाहूनच निलेश राणेंच्या गाड्यांचा ताफा जात असताना निलेश राणे यांनी संजय कामतेकर यांना गाडी थांबवून हस्तांदोलन करत शुभेच्छा दिल्या. यावेळी एकमेकांसोबत हास्य विनोद देखील झाले.





