खारेपाटण महाविद्यालय येथे महाविस्तार AI App व्दारे कृषी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, खारेपाटण यांच्या वतीने महाविस्तार AI App अंतर्गत शेतकरी व विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेला कृषी विषयक मार्गदर्शन कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.
या कार्यक्रमात श्री. अर्जुन जाधव, मंडळ कृषी अधिकारी, तरळे यांनी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या नवीन तांत्रिक पद्धती, आधुनिक शेती मॉडेल्स, स्मार्ट शेती साधने, कीड व्यवस्थापनाच्या अद्ययावत पद्धती आणि उत्पादनवाढीसाठी आवश्यक नवउपक्रम याबाबत मनोगत व मार्गदर्शन केले. त्यांचे अनुभवसमृद्ध आणि तंत्रज्ञानाधारित विचार विद्यार्थी साठीही अत्यंत उपयुक्त ठरले.तसेच श्री. सागर चव्हाण, कृषी सहाय्यक (कृषी अधिकारी), तरळे यांनी विद्यार्थ्यांसाठी कृषी क्षेत्रातील करिअर संधी, विविध शैक्षणिक मार्ग, कृषी उद्योजकता, सरकारी योजना, तसेच ग्रामीण भागातील रोजगाराच्या नवदिशा या विषयांवर सखोल माहिती दिली. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये कृषी क्षेत्राविषयी नवीन उत्साह निर्माण झाला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. ए. डी. कांबळे सर उपस्थित होते. यावेळी आजीवन अध्ययन व विस्तार विभाग प्रमुख माधवी पांचाळ मॅडम, डॉ. वंदना शिंदे मॅडम, प्राध्यापक गजानन व्हंकळी, विघ्नेश सावंत, नमिरा मुजावर तसेच प्रज्योत नलावडे सर उपस्थित होते.
एनएसएस व आजीवन अध्ययन विस्तार विभागातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यक्रम अधिक यशस्वी ठरला.
शेवटी, अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रात नवी वाटचाल करण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. A.D. कांबळे सरांनी केले. प्राध्यापक गजानन व्हंकळी यांनी अधिकाऱ्यांचे व विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक आभार मानले…तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनएसएस विभाग प्रमुख देसाई मॅडम यांनी केले.





