खारेपाटण महाविद्यालयाचा विद्यार्थी यश पाटील याची सिंधुदुर्ग जिल्हा कब्बडी संघात निवड

कणकवली तालुक्यातील नडगीवे बांबरवाडी गावचा सुपुत्र तथा खारेपाटण येथील कला वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ट महाविद्यालयाचा विद्यार्थी कु.यश मेघा संजीव पाटील याची नुकतीच १९ वर्षाखालील सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी संघात निवड झाली असून कु. यश याच्या या निवडी बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.
यश पाटील याला लहान असल्यापासून कबड्डी या खेळाची आवड असून विविध शालेय तसेच प्रायोजित खाजगी स्पर्धांमध्ये त्याने उत्तम खेळाचे प्रदर्शन केलेले आहे.तर शिवगर्जना मित्र मंडळ नडगीवे या मंडळाचा तो खेळाडू असून शिवगर्जना संघाच्या माध्यमातून विविध कबड्डी सामने त्याने खेळलेले आहेत. त्याच्या या खेळाची दखल क्रीडा शिक्षक व अधिकारी यांनी घेऊन नुकतीच त्याची सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी संघात निवड झाली आहे.
त्याच्या या यशाबद्दल नडगीवे गावचे सुपुत्र व श्री. शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबई दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष आणि नडगीवे बांबरवाडी ग्रामस्थ मंडळ मुंबई चे चिटणीस श्री सुभाष पाटील यांनी विशेष अभिनंदन केले आहे. तर खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रवीण लोकरे, खारेपाटण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए डी कांबळे, खारेपाटण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज चे मुख्याध्यापक श्री. संजय सानप, पर्यवेशक श्री. संतोष राऊत तसेच सर्व संचालक मंडळ सदस्य आणि शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांच्या वतीने कु. यश पाटील याचे अभिनंदन करण्यात येत आहे. तर बांबरवाडी प्रगती मंडळ, मुंबई अध्यक्ष श्री. रविद्र आंबेरकर, खजिनदार श्री. रविंद्र पाटील व उपाध्यक्ष श्री. गुरुनाथ पाटील यांनी देखील कुमार यश पाटील याचे अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!