कणकवली बाजारपेठेमध्ये भाजपाकडून प्रचार रॅली, उस्फूर्त प्रतिसाद!

कणकवली शहरामध्ये भाजपाचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील
नगराध्यक्ष पदाचे भाजपाचे उमेदवार समीर नलावडे यांचा विश्वास
कणकवली नगरपंचायत च्या निवडणुकीकरिता नगराध्यक्ष पदाचे भाजपाचे उमेदवार समीर नलावडे व त्यांच्या सहित कणकवली बाजारपेठे मधील प्रभाग क्रमांक 6 च्या उमेदवार स्नेहा अंधारी व व प्रभाग क्रमांक 7 च्या उमेदवार सुप्रिया नलावडे यांच्या सहित प्रचार फेरी काढली. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांसह पदाधिकारी देखील उपस्थित होते. कणकवली शहरातील जनतेकडून या प्रचारादरम्यान उस्फूर्त प्रतिसाद मिळत असून, कणकवली नगरपंचायत च्या निवडणुकीमध्ये भाजपाचे सर्वच उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील. प्रभाग क्रमांक 6 मधून स्नेहा अंधारी व प्रभाग क्रमांक 7 मधून सुप्रिया नलावडे यादेखील आजच्या प्रचार फेरीचा प्रतिसाद पाहता विजयी झाल्याचे मी स्पष्ट करतो. असे आत्मविश्वासाने समीर नलावडे यांनी यावेळी सांगितले. श्री नलावडे यांच्या प्रचार फेरीला बाजारपेठेमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र या निमित्ताने दिसत होते.
दिगंबर वालावलकर कणकवली





