कासार्डे-तळेरे पंचक्रोशीत होणार शासकीय विश्रामगृह

बुवा श्री.संतोष कानडे यांच्या मागणीला यश
कासार्डे-तळेरे विभागात वाढते शहरीकरण लक्षात घेता तळेरे हे मध्यवर्ती ठिकाण पाहता शासकीय विश्रामगृहाची आवश्यकता आहे.तसेच या ठिकाणहून कणकवली व कुडाळ येथील शासकीय विश्रामगृहाची ठिकाणे दूर असल्याने कासार्डे येथे व्यावसायानिमित्त येणारे अनेक अधिकारी,शासकीय कामासाठी दौऱ्यावर येणा-या अधिकारी व कर्मचारी वर्गाची शासकीय विश्रामगृहा अभावी निवासाची गैरसोय लक्षात घेता शासकीय विश्रामगृह व्हावे याकरीता राजश्री शाहू महाराज कलाकार मानधन समिती,सिंधुदुर्ग अध्यक्ष बुवा श्री.संतोष कानडे यानी मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री,सिंधुदुर्ग ना.नितेश राणे यांचे याबाबत लक्ष वेधले असता.ना.नितेश राणे यांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले याच्याशी पत्रव्यवहार करीत तळेरे येथे शासकीय विश्रामगृह बांधण्यासाठी विनंती केली.यानतंर मंत्री ना.शिवेंद्रराजे भोसले यानी तातडीने दखल घेत महाराष्ट्र शासनाचे सार्वजनिक बांधकाम विभागाला तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कक्ष अधिकारी श्री. अनिल ठोसे यानी याबाबत मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, कोकण याना पत्रव्यवहार केला असून लवकरच कासार्डे-तळेरे येथे जिल्हातील इतर तालुक्याप्रमाणे शासकीय विश्रामगृह होणार असल्याने परीसरातून मंत्री ना. नितेश राणे, राजश्री शाहू महाराज कलाकार मानधन समिती, सिंधुदुर्ग अध्यक्ष श्री. संतोष कानडे याचे आभार व्यक्त केले जात आहेत.





