श्री नरहरगुरू वैदिकाश्रम येथे २४ नोव्हेंबर २०२५ रोजी गौरव समारंभ!

स्व. वेदमूर्ती श्री नरहरगुरू लळीत ह्यांची १०६ वी पुण्यतिथि तद्नुसार ७५ वा विद्वज्ज्न सत्कार समारंभ (अमृत महोत्सव) मार्गशीर्ष शुक्ल द्वितीया ते मार्गशीर्ष शुक्ल चतुर्थी शनिवार, दिनांक २२ नोव्हेंबर ते सोमवार, २४ नोव्हेंबर २०२५ या काळात संपन्न होणार आहे. या वर्षी २४ नोव्हेंबर २०२५ रोजी निमंत्रित विद्वान — वे. मू. श्री सुब्रमण्यम घनपाठी (तमिलनाडू), शुक्ल यजुर्वेदवे. मू. श्री उमेश जोशी (उज्जैन) वे. मू. श्री योगेश जोशी, काण्व शाखा (ढालेगाव) ,कृष्ण यजुर्वेद-वे. मू. श्री कुप्पा बाल सुब्रमण्यम घनपाठी (आन्ध्रप्रदेश) ४) सामवेद वे. मू. श्री वासुदेव खोसर, राणायणी शाखा (संभाजी नगर महाराष्ट्र), वे. मू. श्री मृत्युंजय शर्मा कौमुथ शाखा, (तमिलनाडु) वे. मू. श्री केदारनाथ जोशी जैमिनी शाखा (हैदराबाद) अथर्ववेद-वे. मू. पं. आदित्य प्रहराज, पिप्पलाद शाखा (ओडीसा) वे. मू. श्री. सतिन वैद्य, मेत्रायणी शाखा (महाराष्ट्र)।। धर्मो रक्षति रक्षितः ।। वैदिकाश्रमाने पुढील आवाहन केले आहे.
वेद सनातन व अपौरूषेय आहेत. तसेच अतिप्राचीन ज्ञान भंडार आणि भारतीय धर्मसंस्कृती चे आधार स्तंभ आहेत. पुण्य श्लोक देवी अहिल्याबाई होळकर ह्यांच्या इंदूर नगरीत, मानवी जीवनाच्या अंग प्रत्यंगाचा मूलभूत विचार करून मर्मस्पर्शी मार्गदर्शन करणारे व वैदिक साहित्याला सर्वस्व मानून निरपेक्ष भावनेने वेदाचे संवर्धन व अध्यापन या साठी स्वताला वाहून घेणारे, उद्भट् विद्वान वेदमूर्ती स्व. नरहरगुरु लळित गुरुजी ह्यांच्या स्मृति प्रित्यर्थ श्री नरहरगुरु वैदिकाश्रम संस्था गेल्या ७४ वर्षा पासून चार ही वेदांच्या विद्वानांचा सत्कार करीत आहे. ह्या वर्षी ७५ वे वर्ष असुन हा अमृत महोत्सव समारंभ दि. २२ ते २४ नोव्हेंबर २०२५ या अवधीत संपन्न होणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष पद : डॉ. बाळकृष्ण रामचंद्र लळीत, एम. फील, पीएच. डी. हे भूषविणार आहेत.
सर्व भाविकांची उपस्थिती या समारंभास आग्रहपूर्वक प्रार्थनीय आहे.
प. प. श्री पुरुषोत्तम आश्रम स्वामी महाराज (दंडी स्वामी)
अनिल ब. अत्रे (अध्यक्ष)
अनिल गं. मोडक(उपाध्यक्ष)
नितीन पां. पेमगिरीकर (सचिव)
संदीप ह. सबनीस(सहसचिव)
विठ्ठल ज. जोशी (कोषाध्यक्ष)
कार्यकारिणी सदस्य – मंगेश ज. सोमण, विलास भि. जोशीनरहररू वैदिकाश्रम वतीने विनम्र निवेदन करण्यात आले आहेश्री नरहरगुरू वैदिकाश्रम नवीन भवनाचे प्रथम चरण पूर्ण झाल्यावर द्वितिय चरणात (उदवाहन) लिफ्ट चे ही कार्य पूर्ण झाले आहे. तिसऱ्या मजल्या वर १५ खोल्यांचे कार्य प्रस्तावित आहे, तसेच श्री गणपती मंदिरातही वेळोवेळी नूतनीकरण कार्यअसते. ह्या सर्व कार्यासाठी संस्थेला यथायोग्य आर्थिक सहाय्य करावे अशी विनंती. तसेच अन्नदान महादान असल्याने परमपूज्य स्व. श्री डोंगरे महाराज ह्यांच्या प्रेरपीने आणि त्यांनी केलेल्या व्यवस्थे प्रमाणे दर आमावल्या च पोर्णिमा तिथीला श्री गणपती मंदिरात धान्यवाटप केले जात होते. ही निधी बरेच वर्षापासून प्राप्त न झाल्याने धान्यवाटप निधी व अन्य व्यक्तिगत सहकार्याने वैदिकाश्रमाद्वारे महिन्याच्या एक गुरुवारी श्री दत्त मंदिर (रामबाग पुलाजवळ) अन्नदान केले जाते. शैकड़ो लोक या प्रसादाचा लाभ घेतात.उपरोक्त दोन्ही कार्यात सढळ हाताने मदत करावी. असे आवाहन, कार्यकारी मंडळ श्री नरहरगुरु वैदिकाश्रम, रामबाग, इंदूर (म. प्र.)
यांनी केले आहे.

error: Content is protected !!