हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियाना अंतर्गत

खारेपाटण एस टी बस स्थानकाची अधिकाऱ्याकडून पाहणी

महाराष्ट्र शासनाच्या राज्य परिवहन एस टी विभागाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियाना अंतर्गत आज बुधवार दि. १२ नोव्हेंबर २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण एस टी बस स्थानकाची पाहणी एस टी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात आली.
हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियाना अंतर्गत शासनाने नियुक्त केलेल्या मूल्यांकन समितीचे पदाधिकारी तथा रा. प. वीभाग सांगली चे विभाग नियंत्रक श्री. सुनील भोकरे, श्री. प्रवीण पाटील (रा. प. कामगार अधिकारी विभाग सांगली), सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार श्री. संतोष पाटणकर, प्रवासी मित्र श्री. सागर कल्याणकर यांनी खारेपाटण एस टी बस स्थानकाला भेट देऊन संपूर्ण बसस्थानक परिसराची पाहणी केली.
यावेळी कणकवली एस टी बस स्थानक प्रमुख श्री. श्रीनिवास कदम,वाहतूक नियंत्रक श्री यशवंत पावसकर, कणकवली एस टी डेपो सहायक कार्यशाळा अधिकारी श्री अनिश रेडीज,खारेपाटण एस टी बस स्थानक वाहतूक नियंत्रण प्रमुख श्री. प्रवीण कर्पे, माजी सेवानिवृत्त वाहतूक नियंत्रक प्रमुख श्री. चंद्रकांत कांबळे, खारेपाटण बस स्थानक सफाई कामगार श्रीम. सुवर्णा रमेश पाटणकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
खारेपाटण एस टी बस स्थानक हे सिंधुदुर्ग व रत्नागिरी अशा दोन जिल्ह्यांना जोडणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख एस टी बसस्थानक असून येथील परिसर स्वच्छ व सुंदर असून कर्मचारी वर्ग चांगली बस स्थानक सुंदर ठेवण्यासाठी चांगली मेहनत घेत आहेत. यांबद्दल स्वच्छ सुंदर बसस्थानक मूल्यांकन समिती सदस्य तथा सांगली जिल्हा रा.प. विभाग नियंत्रक प्रमुख श्री. सुनील भोकरे यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी कणकवली स्थानक वाहतूक नियंत्रक प्रमुख श्री श्रीनिवास कदम व खारेपाटण एस टी बस स्थानक वाहतूकनियंत्रक प्रमुख कणकवली एस टी डेपो सहायक कार्यशाळा अधिकारी श्री. अनिश रेडीज, खारेपाटण एस टी बस स्थानक वाहतूक नियंत्रण प्रमुख श्री. प्रवीण कर्पे यांनी हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक मूल्यांकन समितीचे खारेपाटण एस टी बसस्थानकात स्वागत केले.

error: Content is protected !!