कोचरे येथील भावई देवीचा १७ ला जत्रोत्सव

वेंगुर्ले तालुक्यातील कोचरे येथील श्रीदेवी भावई चा वार्षिक जत्रोत्सव सोमवार 17 नोव्हेबर रोजी संपन्न होत आहे. या दिवशी सकाळी पूजा अभिषेक, श्रृंगार पुजा, व नंतर ओटी भरणे रात्रौ 11.00 पालखी सोहळा रात्रौ 2 वाजता बाळकृष्ण गोरे दशावतार कवठी असे कार्यक्रम होणार आहेत.
या कार्यक्रमात उपस्थित राहुन भाविक भक्तांनी जत्रोत्सवाची शोभा वाढवावी असे आवाहन रवळनाथ पंचायतन कोचरा, बारा पाच मानकरी यांनी केले आहे.





