
सावंतवाडी प्रांताधिकारी पदी समीर घारे यांची पदोन्नतीने नियुक्ती
मुंबई शहर येथे निवडणूक तहसीलदार पदी होते कार्यरत
सध्या मुंबई शहर निवडणूक तहसीलदार म्हणून कार्यरत असणारे व यापूर्वी कणकवली तालुका तहसीलदार पदी काम केलेले समीर घारे यांची सावंतवाडी प्रांताधिकारी पदी नियुक्ती झाली आहे. श्री घारे यांनी यापूर्वी कणकवली मध्ये तहसीलदार म्हणून काम केले होते. आपल्या कर्तव्यदक्ष कामगिरीमुळे श्री घारे यांनी तहसीलदार म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. त्यानंतर त्यांची मुंबई येथे बदली झाली. मुंबई शहर या ठिकाणी ते निवडणूक विभागाचे तहसीलदार म्हणून कार्यरत होते. या ठिकाणी त्यांना थेट उपजिल्हाधिकारी या पदावर पदोन्नती मिळाल्याने त्याना पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी प्रांताधिकारी पदी नियुक्ती देण्यात आली आहे. उद्या ते प्रांताधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत .
दिगंबर वालावलकर कणकवली





