भाजपाच्या कणकवली नगरपंचायत च्या प्रचाराचा उद्या शुभारंभ

स्वयंभू मंदिरात ग्रामदेवतेला घालणार साकडे
उपस्थित राहण्याचे समीर नलावडे यांचे आवाहन
कणकवली नगरपंचायत च्या निवडणुकीचा भाजपा कडून प्रचाराच्या शुभारंभ कणकवली ते ग्रामदैवत स्वयंभू मंदिरात गुरुवार 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे. कणकवली नगरपंचायत करिता भाजपा च्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज पालकमंत्री नितेश राणे व माजी आमदार प्रमोद जठार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये घेण्यात आल्या. त्यानंतर कणकवली शहरातील भाजपच्या काही उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली. व नगराध्यक्ष पदासाठी समीर नलावडे यांचे एकमेव नाव आल्याने भाजपची पहिली यादी जवळपास निश्चित झाली आहे. त्यामुळे उद्यापासून भाजपाच्या कणकवली शहरात जाहीर प्रचार सुरू करण्यात येणार आहे. यावेळी भाजपाचे कणकवली मधील पदाधिकारी व देवस्थानचे मानकरी उपस्थित असणार आहेत. यावेळी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे.
कणकवली प्रतिनिधी





