कणकवली नगरपंचायतीसाठी दोन दिवसात एकही अर्ज दाखल नाही

निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे यांची माहिती
कणकवली नगरपंचायत च्या निवडणुकीसाठी 10 नोव्हेंबर पासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, पहिल्या दोन दिवसात कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी एकही नामनिर्देशन पत्र दाखल झालेले नाही अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे यांनी दिली. कणकवली नगरपंचायत च्या निवडणुकीकरिता 17 प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी जनतेतून थेट निवड केली जाणार आहे. कणकवली तहसीलदार कार्यालयामध्ये हे नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार असून आजपासून ते 17 नोव्हेंबर पर्यंत सकाळी 11 ते दुपारी तीन वाजे पर्यंत नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार आहेत. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्री देशपांडे यांनी दिली. नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी 7 दिवसांचा कालावधी असून यामध्ये शनिवारी 15 नोव्हेंबर रोजी देखील नामनिर्देशन पत्र स्वीकारली जाणार आहेत. रविवारी 16 नोव्हेंबर रोजी नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार नाहीत. त्यानंतर 17 नोव्हेंबर रोजी नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा अंतिम दिवस असणार आहे.





