त्रिंबक हायस्कूलला १९८०-८१ च्या दहावी बॅच कडून एक लाखाची देणगी…!

जनता विद्या मंदिर त्रिंबक प्रशालेचा प्रयोगशाळा विभाग नुकताच अद्ययावत करण्यात आला. याकामी काही संस्थांनी आर्थिक मदत केली होती. यांची माहिती प्रशालेच्या १९८०-८१ च्या माजी विद्यार्थी बॅचला समजली. त्यांनी आपल्या
बॅचच्या सर्व वर्ग मित्रांनकडून एक लाख रुपये निधी संकलन करून तो संस्थाध्यक्ष सुरेंद्र (अन्ना) सकपाळ यांच्याकडे 6 नोव्हेंबर रोजी सुपूर्द केला. यावेळी महेंद्र मांजरेकर, विजय भाटकर यांनी शाळे विषय आपले विचार मांडले.
यावेळी कार्यवाह अरविंद घाडी, मुख्याध्यापक प्रवीण घाडीगांवकर, एकनाथ घाडी, विजय भाटकर, नंदकुमार घाडी, महेंद्र मांजरेकर, सुर्यकांत घाडीगांवकर, गिरगोल फर्नांडिस, सौ. सुनिता जाधव, सौ. शशिकला घाडीगांवकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक महेंद्र मांजरेकर यांनी तर आभार कार्यवाह अरविंद घाडी यांनी मानले.





