ज्ञानाबरोबर अंगभूत कलेचा विकास हेच खरे शिक्षण – प्रशांत धोंड

बॅ नाथ पै शिक्षण संस्थेचा ‘स्वर संध्या’ कार्यक्रम ठरला यादगार

ज्ञानाबरोबर अंगभूत कलेचा विकास जेथे केला जातो तेच खरे शिक्षण बौद्धिक ज्ञानाबरोबर कलेची दोस्ती जगण्याचे मर्म सांगून जाते.अशा प्रकारचे शिक्षण देण्यामध्ये बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचा हातखंड आहे. अशा शब्दात निवृत्त मुख्याध्यापक तथा सुप्रसिद्ध कीर्तनकार प्रशांत धोंड यांनी संस्थेचे कौतुक केले. बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेतर्फे दिवाळीच्या पूर्वसंध्येला आयोजित स्वरसंध्या पर्व-3 च्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
दिवाळीच्या पूर्वसंध्येला बॅ नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यावेळी व्यासपीठावर चेअरमन उमेश गाळवणकर, त्यांचे आई-वडील, अमृता गाळवणकर, प्रा अरुण मर्गज, प्रा परेश धावडे, प्राचार्य चैताली बांदेकर प्रा.कल्पना भंडारी, डॉक्टर प्रत्युषरंजन बिस्वाल, गुरु देसाई, विठोबा सावंत इत्यादी उपस्थित होते.
सचिन कुडतरकर आणि मंदार जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सीबीएसई सेंट्रल स्कूल, जुनिअर कॉलेज ते नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थी गायक कलाकारांनी शुभंकरोती, आली कुठूनशी कानी…, वासुदेवाची स्वारी, तू बुद्धी दे, खेळ मांडीयेला, मल्हारवारी, मी डोलकर, इंद्रायणी काठी, आम्ही बी घडलो.., आली माझ्याघरी ही दिवाळी, दीपावली, चल चल ग सखे, तू ग दुर्गा,भेटला विठ्ठल, आशा विविध प्रकारच्या गीतांचा समावेश असलेली सुमधुर गीतं विद्यार्थ्यांनी आपल्या सुरेल व मधुर आवाजात सादर करून उपस्थितांची ची दाद मिळवली.
या गीत गायनामध्ये तनया तवटे, समीर गावडे सलोनी खंदारे, चित्रा बोभाटे, सानवी खवणेकर, सौम्या नाईक, संकेत पाटकर, हिमांशू पेडणेकर, श्रावण मेस्त्री, शमिका सुकी, साक्षी सुभेदार, सानिका वालावलकर, सोनाली जाधव, रिया जाधव, वेदा पाटकर, प्रज्ञा आचार्य, शुभम, खुशी शिरोडकर, शनाया कुंभार, प्रणिता देसाई, मुग्धा शिरसाट, सिया देसाई, यांनी सहभाग नोंदवत हा स्वर संध्या कार्यक्रम अतिशय दर्जेदारपणे सादर केला.
या दर्जेदार गीत सादरीकरणाला तबला- रजत गाळवणकर, पखवाज युवराज माधव, गिटार देविदास नागोळकर, हारमोनियम मंदार जोशी, कीबोर्ड महेश तळगावकर, साईड रिदम भार्गव चव्हाण, ऑक्टो पॅड- सचिन कुडतरकर यांची उत्तम साथ लाभली. याला निचम बंधूंची सुंदर साऊंड सिस्टिमची साथ लाभलेली होती, त्यामुळे हा कार्यक्रम अतिशय दर्जेदार व देखणा झालेला होता.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चेअरमन उमेश गाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसाद कानडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोलाची साथ दिली. त्यामुळे नेपथ्यदृष्ट्या सुद्धा हा कार्यक्रम अतिशय दर्जेदार झाला.

error: Content is protected !!