पाट हायस्कूलमध्ये शुभेच्छा कार्ड कार्यशाळा

शुभेच्छा कार्ड आणि दिवाळी हे अतूट नाते आहे. आजच्या डिजिटल युगात हे नाते टिकवायचे असेल तर अशा कार्यशाळेची गरज आहे. त्यामुळे पाट हायस्कूलमध्ये कलाशिक्षक संदीप साळसकर यांच्या संकल्पनेतून या कार्यशाळेचे आयोजन आले होते.
एस के पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी या संस्थेमध्ये विविध कलाविषयक उपक्रम घेतले जातात. या उपक्रमामधून विविध चित्रांचे निर्मितीही केली जाते. पंचक्रोशीच्या कलाक्षेत्रात यामुळे कलाकारही या उपक्रमातून तयार होतात. यावर्षी इयत्ता आठवी आणि सातवीच्या वर्गांसाठी शुभेच्छा कार्ड बनविणे ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
कोलाज काम, पोस्टर कलर, कलर पेन्सिल, स्केच पेन असे कलाविषयक साहित्याचा वापर करून छान छान शुभेच्छा कार्ड मुलांनी तयार केली. यामध्ये प्रथम क्रमांक योगिनी लक्ष्मण खोर्जुवेकर इयत्ता आठवी, द्वितीय क्रमांक खुशी कृष्णा कोचरेकर इयत्ता सातवी, तृतीय क्रमांक पूर्वा प्रकाश मुणगेकर इयत्ता सातवी आणि उत्तेजनार्थ प्रथम अंतरा सत्यवान दुतोंडकर इयत्ता सातवी तर उत्तेजनार्थ द्वितीय दूर्वा दत्तात्रय म्हैसकर याना मिळाला.
यावेळी मुख्याध्यापक राजन हंजनकर, पर्यवेक्षक सयाजी बोंदर, कलाशिक्षक संदीप साळसकर, संजय पवार. रमेश ठाकूर त्याचप्रमाणे स्वप्नाली गोसावी यांनी काम पाहिले विद्यालय आणि संस्था संचालकातर्फे यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन करण्यात आले.

error: Content is protected !!