नेरुर येथे नरकासुर आणि बैल सजावट स्पर्धा

उद्योजक रूपेश पावसकर यांची पत्रकार परिषदेत माहिती
रणझुंजार मित्र मंडळ व उद्योजक रुपेश पावस्कर पुरस्कृत नेरुर पंचक्रोशी मर्यादित कलेचा देव कलेवर भव्य नरकासूर स्पर्धा २०२५ रविवार दि. १९ ऑक्टोबर २०२५ रोजी, तर बुधवार दि. २२ ऑक्टोबर २०२५ रोजी भव्य बैल सजावट स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या स्पर्धेचे पहिलेच वर्ष असून विजेत्यांना आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. अशी माहिती उद्योजक रुपेश पावसकर यांनी दिली. कुडाळ येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
रुपेश पावसकर म्हणाले, नेरूर चव्हाटा येथे रविवार दिनांक १९ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता कलेचा देव कलेवर भव्य नरकासूर स्पर्धा होणार आहे. त्याचप्रमाणे बुधवार दिनांक २२ ऑक्टोबर २०२५ रोजी भव्य बैल सजावट स्पर्धा २०२५ होणार आहे. या स्पर्धेत बैल मालक प्रकाश साऊळ, आजीम मुजावर, भाई नारिग्रेकर, विशाल नाईक, बाळा रेवंडकर, आनंद लिंगे, अवि शिरसाद, स्वप्निल नेरुरकर, बाळा नांदोसकर, बावी साऊळ ते बैल मालक सहभागी असणार आहेत. या निमित्त कलेवर मंदिर नेरूर ने नेरूर चव्हाटा अशी या सजविलेल्या बैलांची रॅली काढण्यात येणार आहे.
कलेचा देव कलेश्वर भव्य नरकासुर स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रोख रक्कम रुपये १२ हजार व आकर्षक चषक, व्दितीय पारितोषिक रोख रक्कम रुपये ७ हजार व आकर्षक चषक, तृतीय पारितोषिक रोख रक्कम रुपये ४ हजार व आकर्षक चषक तसेच उत्तेजनार्थ पारितोषिके आहेत. इतर सर्व सहभागी मंडळांकरिता रोख रक्कम रुपये १ हजार पारितोषिक आहे.
या स्पर्धेसाठी नियमावली देखील जाहीर करण्यात आली. आहे. नरकासुर स्पर्धेच्या ठिकाणी वेळेत आणणे बंधनकारक राहील. उशीर झाल्यास दहा गुण कमी करण्यात येतील, सादरीकरणात नरकासुराचा वध करणे आवश्यक आहे, कथा पौराणिक कथेचा आधार घेऊन वध करावा गरजे नुसार थोडाफार बदल करण्यास हरकत नाही, सादरीकरणाची वेळ प्रत्येक संघासाठी जास्तीत जास्तीत 10 मिनिटे देण्यात येईल, ही स्पर्धा नेरूर पंचक्रोशी मर्यादित राहील, स्पर्धा चालू झाल्यानंतर सादरीकरण एकदाच करता येईल, परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
या स्पर्धेसाठी ज्या आधारे गुणानुक्रम देण्यात येणार आहेत, त्याबद्दल सुद्धा रुपेश पावसकर यांनी माहिती दिली. नरकासुर प्रतिमा -20 गुण, वेशभूषा/रंगसंगती -10 गुण, चल चित्र -10 गुण, नाविन्यपूर्ण/ वैशिष्ट्यपूर्ण -10 गुण, सादरीकरण / नरकासुर वध -30 गुण, नरकासुर स्पर्धेच्या ठिकाणी वेळेवर आणणे -10 गुण, विषय / प्रश्नोत्तर -10 गुण, एकुण १०० गुण असतील.
तरी नेरूर पंचक्रोशीतील जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घेऊन कार्यक्रमाचा आनंद द्विगुणीत करावा असे आवाहन रणझुंजार मित्र मंडळ व उद्योजक रुपेश पावसकर यांनी केले आहे. यावेळी रामचंद्र परब आणि संतोष परब उपस्थित होते.





