आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे मध्ये मुलांनी सादर केले वेशभूषा व नृत्यविष्कार

कणकवली/मयूर ठाकूर
ज्ञानदा शिक्षण संस्थेचे आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्यूनियर कॉलेज वरवडे आणि नवदिव्यांग फाउंडेशन संस्था संचलित आयडियल स्पेशल स्कूल वरवडे यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यक्रम नुकताच आयडियल इंग्लिश स्कूलच्या सभागृहात पार पडला
दिव्यांग व स्वमग्न मुलांमधील कला गुणांना वाव देणारा तसेच अंधकारातून प्रकाशाकडे नेणारा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला . मुलांनी तयार केलेले मातीचे दिवे,उटणे, यासारख्या वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.
या प्रदर्शनाचे उद्घाटन सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर या मुलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी वेशभूषा कार्यक्रम आयोजित केला होता. वारकरी, शकुंतला, नरकासुर, शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले,विठ्ठल, अशा विविध वेशभूषा साकारत मुलांनी पालक वर्गातून वाहवा मिळवली. मुलांनी त्यानंतर लावणी, वारकरी नृत्य, असे नृत्यविष्कार सादर करत आपले नृत्य गुण दाखवले आपल्या दिव्यांग किंवा स्वमग्न क्षमतेवर मात करत विद्यार्थ्यांनी सादर केलेला हा कार्यक्रम खूपच कौतुक करणारा ठरला.
मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आले .कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर ज्ञानदा शिक्षण संस्थेचे सल्लागार डी.पी तानावडे सर,आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापिका सौ. अर्चना शेखर देसाई, आयडियलचे स्कूल कोऑर्डिनेटर निलेश घेवारी सर, ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख पूजा कुलकर्णी मॅडम,स्पेशल स्कूल विभाग प्रमुख मंजिरी घेवारी मॅडम,तसेच स्पेशल स्कूल चे पुरुषोत्तम पाताडे सर, तसेच आयडियल स्पेशल स्कूल चे सर्व शिक्षक विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयडियल इंग्लिश स्कूलचे सहशिक्षक हेमंत पाटकर सर यांनी केले.





