खारेपाटण येथील दिवाळी बाजाराचे आम. निलेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन

आ. निलेश राणे यांनी दिवाळी बाजार उपक्रमासाठी मंगेश गुरव यांचे केले कौतुक
खारेपाटण तालुका निर्मिती आणि खारेपाटण अंतर्गत रोड काँक्रिट कारणासाठी संपूर्ण सहाय्य करणार
सिंधुदुर्ग मध्ये लवकरच महिलांसाठी उमेद भवन उभे राहणार -आम. निलेश राणे
खारेपाटण येथे बुधवार दि. 15/10/2025 रोजी दिवाळी बाजार या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बचतगटाच्या महिलांना एक हक्काचं व्यासपीठ मिळावं या दृष्टीने दिवाळी बाजार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आम. निलेश राणे यांनी या कार्यक्रमाला भेट आवर्जून भेट दिली व या कार्यक्रमाचे उदघाट्न करण्यात आले. भरपावसातही कार्यकर्त्या च्या आग्रहाखातर आम.निलेश राणे खारेपाटण ला दाखल होत सर्व कार्यकर्त्याचा उत्साह वाढवला. कणकवली तालुका प्रमुख मंगेश गुरव यांच्या संकल्पनेतून खारेपाटण विभागातील बचतगटाच्या उत्पादना साठी तसेच लघु उद्योग व व्यापाऱ्यांसाठी वस्तूंचे प्रदर्शन व विक्री यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देत दिवाळी बाजाराचे आयोजन खारेपाटण येथे करण्यात आले आहे.
या उद्घाटन कार्यक्रमावर परतीच्या पावसाचे सावट होते, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला पण तरीही आम. नीलेश राणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलेला शब्द पाळत खारेपाटण येथे भेट दिली. दिवाळी बाजाराची कार्यक्रम स्थळी पाहणी केली व श्री. मंगेश गुरव व टीम चे भरभरून कौतुक करत पाठीवर शाबासकीची थाप दिली.
पक्ष कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात आम. निलेश राणे, माजी आम. राजन तेली, उपनेते संजय आंग्रे विधानसभा प्रमुख संदेश पटेल, कणकवली तालुका प्रमुख दामू सावंत, खारेपाटण विभाग प्रमुख गुरु शिंदे, कृषी संचालक – मंगेश ब्रह्मदंडे, शहरप्रमुख – सुहास राऊत, ग्रामपंचायत सदस्य – अस्ताली पवार पवन कावळे, मोहन कावळे आदि. मान्यवर उपस्थित होते.
खारेपाटण येथील बचत गटाच्या CRP -सायली तुरळकर, ग्रामसंघाच्या प्रमुख -सौ. पोटले मॅडम, गणेश कृपा बचत गटाच्या प्रतिनिधी सौ. चिके, सौ. राऊत तसेच सहभागी स्टॉल धारक श्री. विश्वनाथ गुरव, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे खारेपाटण विभागाच्या वतीने सत्कार करण्यात आले. या वेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून दिल्ली येथे बचत गटाच्या प्रदर्शनाला सिंधुदुर्ग चे प्रतिनिधित्व करणाऱ्या खारेपाटण येथील श्री समर्थ बचत गटाच्या सौ पोटले मॅडम यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.vग्रामपंचायत सदस्य अस्थली पवार यांचा सात DFarm अभ्यासक्रम यशस्वी रित्या पूर्ण केल्या बद्दल सत्कार करण्यात आला. अशा उपक्रमामुळे ग्रामीण भागातील स्थानिक महिला बचत गटांच्या मालाला बाजारपेठा उपलब्ध करून दिल्या मुळे शासनाच्या महिला सक्षमीकरण कार्याला गती मिळवून महिला आर्थिक निर्भर होण्यासाठी मदत होईल असे आम. निलेश राणे म्हणाले, तसेच खारेपाटण तालुका निर्मिती दृष्टीक्षेपात असून शासन स्तरावर लागेल ती मदत पक्ष म्हणून आम्ही करू असा शब्द त्यांनी खारेपाटण वासियाना दिला. तसेच खारेपाटण मध्ये मोठ्या प्रमाणात पूर येत असल्यामुळे रस्ते सतत खराब होतात या करीता सिमेंट काँक्रिट रोड करीता प्रयत्न करणार असल्याचे आम. नीलेशजी राणे यांनी सांगितले.
या प्रसंगी उपाशीत CRP -सौ. सायली तुरळकर तसेच ग्रामसंघाच्या प्रमुख सौ. पोटले यांनी मनोगते व्यक्त केली. त्यांनी आम. निलेश राणे यांच्याकडे महिला उमेद भवन ची मागणी केली.येत्या काही काळातच महिला उमेद भवन उभारून देण्याचा शब्द आम. निलेश राणे यांनी उपस्थित बचत गटाच्या महिलांना दिला.
आमची लाडकी पाळीव कुत्री “झेना” (पॉमेरियन जात) दिनांक 7 फेब्रुवारीच्या रात्रीपासून हरवली आहे. ती आमच्या कुटुंबाचा एक भाग आहे.
🐶 नाव: झेना
🐾 जात: पॉमेरियन
🎨 रंग: तांबूस/तांबड्या रंगाचे केस
📏 उंची: सुमारे 1 फूट
🎂 वय: 2 वर्षे
ती कोणाला दिसल्यास, सापडल्यास किंवा तिच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाल्यास कृपया त्वरित संपर्क साधावा.
झेनाला सुरक्षित परत आणून देणाऱ्यास योग्य बक्षीस दिले जाईल.
📍 पत्ता: धुरीवाडा, मालवण
(तोंडवळकरांच्या चक्कीच्या बाजूचे घर)
📞 संपर्क: 7506829118
— कौस्तुभ चंद्रकांत फोंडबा
🙏 कृपया ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा. तुमची एक शेअर आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. धन्यवाद.





